सशस्त्र दरोड्याच्या तयारीत असलेली पाच जणांची टोळी जेरबंद

सशस्त्र दरोड्याच्या तयारीत असलेली पाच जणांची टोळी जेरबंद
Published on: 

पाच जणांची सशस्त्र टोळी अटकेत
चार पिस्तूल, एक कट्टा आणि ५६ जिवंत काडतुसे जप्त
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ४ : सशस्त्र दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या झारखंड आणि छत्तीसगड येथील पाच जणांच्या टोळीला अटक करण्यात आली. ठाणे गुन्हे शाखेच्या घटक क्रमांक एकच्या पथकाने साकेत सर्व्हिस रोडवर सापळा रचून ही अटक केली. त्यांच्याकडून चार देशी बनावटीची पिस्तुले, एक देशी कट्टा आणि ५६ जिवंत काडतुसे असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला.
ठाणे गुन्हे शाखेला २ नोव्हेंबरला साकेत सर्व्हिस रोडवर पाच ते सहा जण शस्त्रांसह एकत्र येणार असल्याची माहिती मिळाली होती. अटक करण्यात आलेल्यांमध्ये रितीक शशिकांत तिवारी (वय २५), शुभम सुनील तिवारी (२४), कार्तिक कुमार चौधरी (२३), मृत्युंजय कुमार चौबे (२६) आणि बृजकिशोर नन्हकु तिवारी (५४) यांचा समावेश आहे. हे सर्व जण झारखंड आणि छत्तीसगडमधील रहिवासी असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. पोलिसांनी घेतलेल्या अंगझडतीत चार देशी बनावटीची पिस्तुले, एक देशी कट्टा आणि ५६ जिवंत काडतुसे आढळली. याशिवाय पाच मोबाईल, रोख रक्कम, बॅगा आणि आठ मीटर लांबीची नायलॉनची दोरीही जप्त करण्यात आली. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे नऊ लाख १९ हजार १०० रुपये आहे. याप्रकरणी वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
...............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.