

उन्हाचा वाढता चटका
नारळ पाण्याला मागणी; भावात २० टक्क्यांची वाढ
वाशी, ता. ५ (बातमीदार) : साधारणपणे ऑक्टोबरनंतर वातावरणात गारवा जाणवू लागतो; मात्र यंदा नोव्हेंबरमध्येही नवी मुंबईकरांची उन्हापासून सुटका झालेली नाही. तापमानाचा पारा ३६ अंशांपर्यंत पोहोचत असल्याने दुपारच्या उन्हाचा तडाखा नागरिकांना सहन करावा लागत आहे. उष्णतेपासून दिलासा मिळवण्यासाठी नागरिकांनी नैसर्गिक पेयांकडे मोर्चा वळवला असून, नारळ पाण्याला विशेष पसंती मिळत आहे. वाढत्या मागणीमुळे नारळाच्या भावातही सुमारे २० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
वाशी, नेरूळ, बेलापूर, घणसोली आणि ऐरोली परिसरातील नारळ पाण्याच्या स्टॉलवर दुपारच्या वेळी ग्राहकांची गर्दी होत आहे. उन्हामुळे घामावाटे शरीरातील पाणी आणि क्षार कमी होत असल्याने अनेकजण शीतपेयांऐवजी नारळ पाण्याला पसंती देत आहेत. नैसर्गिक पेय म्हणून नारळ पाण्याची मागणी वाढल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
गतवर्षी ६० ते ७० रुपयांना मिळणारा नारळ आता आकारमानानुसार ७० ते ९० रुपयांना विकला जात आहे. मागणी वाढल्याने भावात सुमारे २० टक्क्यांची वाढ झाल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
शरीराचे संतुलन राखण्यास मदत
नारळ पाण्यात पोटॅशियम आणि विविध इलेक्ट्रोलाइट्स असतात. त्यामुळे शरीरातील द्रवपदार्थांचे संतुलन राखण्यास मदत होते, मात्र नियमित पाणी पिणे आणि योग्य आहार घेणेही आवश्यक आहे, असे जनरल फिजिशियन डॉ. प्रतीक तांबे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.