

पोलादपूरमध्ये शेतकरी संकटात
आधी ७० ते ८० टक्के भातपिकाची हानी; अवकाळीने उरलेले पीकही आडवे
पोलादपूर, ता. ५ (बातमीदार) : पावसाअभावी आधीच ७० ते ८० टक्के भातपिकाचे नुकसान झालेल्या पोलादपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा आणखी फटका बसला आहे. कापणीला आलेले उरलेले पीकही जमिनीवर आडवे झाल्याने यंदाचा भात हंगाम संकटात सापडला आहे. रायगड जिल्हा परिषद कृषी व शिक्षण सभापती चंद्रकांत कळंबे यांनी देवळे विभागात बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी त्यांनी केली.
पोलादपूर तालुक्यातील बहुतांश शेतकरी भातशेतीवर अवलंबून असून, अनेकांची शेती एकपिकी आहे. गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने रोपे करपली आणि पिकाची वाढ खुंटली. त्यातून वाचलेले पीक घरात आणण्याची तयारी सुरू असतानाच गेल्या दोन दिवसांतील पावसाने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले. जनावरांसाठी चारा आणि आगामी हंगामासाठी आर्थिक तरतूद करण्याचेही संकट निर्माण झाले आहे.
मदतीसाठी लोकप्रतिनिधींचा पुढाकार
पंचायत समिती सभापती अविनाश शिंदे आणि सदस्य अनिल दळवी यांच्यासह कळंबे यांनी देवळे विभागात पाहणी केली. उरलेले सुमारे २० टक्के पीकही पावसामुळे पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पोलादपूर प्रेस क्लब आणि विविध संस्थांनी यापूर्वी दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती. बाधित शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, असे आवाहन कळंबे यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.