धारावीतील एन. शिवराज मैदानाची पालिकेच्या वतीने साफसफाई

धारावीतील एन. शिवराज मैदानाची 
पालिकेच्या वतीने साफसफाई
Published on: 

धारावी, ता. ५ (बातमीदार) : संत कक्कय्या मार्गावरील नवीन म्युनिसिपल चाळीसमोरील एन. शिवराज मैदानाची माेठ्या प्रमाणात दुरवस्था झाली हाेती. याप्रश्नी धारावी नागरिक समिती व अन्य संघटनांनी महापालिकेवर धडकण्याचा इशारा दिला होता. या समस्येबाबत ‘सकाळ’मध्ये गुरुवार (ता. ५)च्या अंकात ‘एन. शिवराज मैदानाची दुरवस्था’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्याची पालिकेने दखल घेत मैदानाच्या स्वच्छतेला सुरुवात केली आहे. यामुळे स्थानिक रहिवासी व सामाजिक संघटनांनी समाधान व्यक्त केले आहे.

गणेश विसर्जनासाठी मैदानात कृत्रिम तलाव उभारण्यात आला होता. स्थानिकांचा विरोध असतानाही तलाव बनविण्यात आला. विसर्जनानंतर तलाव हटविण्यात आला; मात्र खोदकामातील माती व्यवस्थित पसरवली नसल्याने मैदानात मातीचा मोठा ढिगारा तयार झाला होता. त्यामुळे मुलांना खेळण्यासाठी मैदान उपलब्ध नव्हते. ढिगाऱ्यावर खेळणाऱ्या लहान मुलांच्या अपघाताचा धोका निर्माण झाला होता. याशिवाय खेळाचे साहित्य तुटलेले, सुरक्षा रक्षकांचा अभाव, १० हजार लिटरची रिकामी पाण्याची टाकी, वृक्षांना पाण्याची अनुपलब्धता आणि अस्वच्छता अशा अनेक समस्या होत्या.

या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी धारावी नागरिक समितीचे संघटक सचिव दिलीप गाडेकर यांच्यासह अलका साबळे, गिरीराज शेरखाने, गोविंद भोईटे, जयराम सदाफुले, सरिता शेरखाने आणि दत्ता खंदारे यांनी महापौर, विरोधी पक्षनेते, महापालिका आयुक्त, स्थानिक आमदार, नगरसेवक तसेच संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. दिवाळीच्या तोंडावर मागण्यांची पूर्तता न झाल्यास महापालिकेवर धडक देण्याचा इशाराही समितीने दिला होता.

धारावी : एन. शिवराज मैदानाची पालिकेच्या वतीने साफसफाई केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.