दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी ६१ लाखांची मदत

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी ६१ लाखांची मदत
Published on: 

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी ६१ लाखांची मदत
घाटकोपरमधील लोकप्रतिनिधींसह नागरिकांचे योगदान
घाटकोपर, ता. ५ (बातमीदार) : राज्यातील मराठवाडा आणि विदर्भासह अनेक भागांत पावसाअभावी दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, शेतकरी संकटात सापडले आहेत. या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी घाटकोपरमधील लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला आहे. आमदार पराग शाह, महापौर रितू तावडे आणि नगरसेवक धर्मेश गिरी यांच्यासह नागरिकांनी आतापर्यंत ६१ लाख रुपयांची मदत जमा केली आहे. ही मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे.
घाटकोपर वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून आमदार पराग शाह यांनी २१ लाख रुपयांची मदत दिली आहे. तसेच महापौर रितू तावडे आणि गिरीराज डेव्हलपर्सचे संचालक तथा नगरसेवक धर्मेश गिरी यांनी दोन लाख ११ हजार रुपयांचे योगदान दिले आहे. या मदतकार्यात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन शाह आणि गिरी यांनी व्हिडिओच्या माध्यमातून केले आहे.
मदतकार्याचा ओघ सुरूच असून, दुष्काळग्रस्त भागांतील शेतकऱ्यांची माहिती संकलित करण्यात येत आहे. त्यानंतर गरजू शेतकऱ्यांपर्यंत प्रत्यक्ष मदत पोहोचविण्यात येणार आहे. मराठवाडा आणि विदर्भातील दुष्काळग्रस्त भागांपासून या मदतकार्याची सुरुवात करण्यात येणार असल्याचे आमदार पराग शाह यांनी सांगितले. शेतकरी हा संपूर्ण समाजाचा अन्नदाता आहे. त्याच्यावर संकट ओढवले असताना केवळ सहानुभूती व्यक्त न करता प्रत्यक्ष मदतीसाठी पुढे येणे ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे. त्यामुळे नागरिकांनीही या मदतकार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.