बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक

बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक
Published on: 

भिवंडी, ता. ९ (बातमीदार) : ठाणे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने रांजनोली नाक्यावर एका व्यक्तीला गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसांसह पकडले. तर भिवंडी शहर पोलिसांनी चंदनबाग परिसरातून धारदार कोयता बाळगणाऱ्या तरुणाला अटक केली. विशेष म्हणजे, दुसऱ्या आरोपीवर यापूर्वीच दोन वर्षांसाठी हद्दपारीचा आदेश लागू करण्यात आला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ नोव्हेंबरला दुपारी सव्वा एकच्या सुमारास ठाणे गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाला मुंबई-नाशिक महामार्गावरील रांजनोली नाक्याजवळ एक व्यक्ती संशयास्पद फिरताना आढळली. त्याची झडती घेतली असता सलीम सय्यद खान (वय ३९, रा. रहमत अपार्टमेंट, कौसा, मुंब्रा) याच्याकडे गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे सापडली. या शस्त्रांची एकूण किंमत ५४ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. दुसऱ्या घटनेत भिवंडी शहर पोलिसांनी चंदनबाग परिसरातील वऱ्हाळदेवी नगर येथून गौतम माने (वय २९) याला अटक केली. २ नोव्हेंबरला दुपारी पावणेचारच्या सुमारास तो वऱ्हाळदेवी उद्यानाजवळ धारदार लोखंडी कोयता घेऊन फिरत असल्याचे आढळले. त्याच्याकडून ३५० रुपये किमतीचा कोयता जप्त करण्यात आला.
तपासात गौतमविरोधात २२ फेब्रुवारी २०२५ रोजी हद्दपारीचा आदेश बजावण्यात आल्याचे निष्पन्न झाले. या आदेशानुसार त्याला ठाणे, मुंबई, रायगड, नवी मुंबई आणि पालघर जिल्ह्यांत दोन वर्षांसाठी प्रवेशबंदी होती. मात्र, परवानगी न घेता भिवंडीत प्रवेश करून त्याने आदेशाचे उल्लंघन केले. दोन्ही प्रकरणांत स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.