माणगावात सिटी स्कॅनला प्रतिसाद

माणगावात सिटी स्कॅनला प्रतिसाद
Published on: 

माणगावात सीटी स्कॅनला प्रतिसाद
दरमहा ५०० रुग्णांची तपासणी; खासगी केंद्रांच्या तुलनेत कमी खर्चात सुविधा
माणगाव, ता. ५ (वार्ताहर) : माणगाव उपजिल्हा रुग्णालयातील सीटी स्कॅन तपासणी सुविधेला रुग्णांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, दरमहा सुमारे ५०० रुग्ण या सेवेचा लाभ घेत आहेत. खासगी रुग्णालयांच्या तुलनेत अत्यल्प दरात तपासणी उपलब्ध होत असल्याने ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना मोठा आर्थिक दिलासा मिळत आहे.
खासगी रुग्णालयांत सीटी स्कॅनसाठी साधारणतः ८ ते १५ हजार रुपये खर्च येतो, मात्र माणगाव उपजिल्हा रुग्णालयात ही तपासणी ५०० ते १२०० रुपयांत केली जाते. त्यामुळे गरीब, शेतकरी, मजूर आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना मोठा फायदा होत आहे.
राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून लाखो रुपये खर्च करून रुग्णालयात सीटी स्कॅन मशीन उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे परिसरातील रुग्णांना तपासणीसाठी मुंबई, महाड किंवा अन्य मोठ्या शहरांत जाण्याची गरज कमी झाली आहे. मेंदूविकार, अपघातातील दुखापती, पोटाचे विकार आणि फुप्फुस सांच्या आजारांच्या निदानासाठी ही तपासणी उपयुक्त ठरते.
वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता मशीनची नियमित कार्यक्षमता, प्रशिक्षित तांत्रिक मनुष्यबळ आणि तपासणीचा दर्जा कायम राखणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.