

श्रीवर्धनमध्ये प्लॅस्टिक बंदीची अंमलबजावणी
प्रतिबंधित वस्तूंचा वापर, विक्री व साठवणूक करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा इशारा
श्रीवर्धन, ता. ५ (वार्ताहर) : शहर स्वच्छ आणि पर्यावरणपूरक ठेवण्यासाठी श्रीवर्धन नगर परिषदेने ‘प्लॅस्टिकमुक्त श्रीवर्धन’ मोहीम हाती घेतली आहे. शहरात एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्रतिबंधित प्लॅस्टिक वस्तूंचा वापर, उत्पादन, विक्री आणि साठवणूक रोखण्यासाठी विशेष जनजागृती करण्यात येत आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा नगर परिषद प्रशासनाने दिला आहे.
केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार १ जुलै २०२२ पासून देशभरात विशिष्ट एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लॅस्टिक वस्तूंवर बंदी लागू आहे. तसेच १२० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्यांवरही प्रतिबंध आहे. नगर परिषद हद्दीतील व्यापारी, दुकानदार, फेरीवाले आणि हॉटेल व्यावसायिकांनी प्रतिबंधित प्लॅस्टिकचा वापर किंवा विक्री करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
नियमभंग केल्यास कारवाई
प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन नियम २०१६ (सुधारित २०२१) आणि पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ नुसार उल्लंघन करणाऱ्यांवर दंड, साहित्य जप्ती तसेच नियमानुसार परवाना रद्द करण्याची कारवाई होऊ शकते. नागरिकांनी प्लॅस्टिक पिशव्यांऐवजी कापडी पिशव्यांचा वापर करावा आणि शहराच्या स्वच्छतेसाठी मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.