वसई-विरारमध्ये दिवाळीचा उत्साह शिगेला

वसई-विरारमध्ये दिवाळीचा उत्साह शिगेला
Published on: 

वसई-विरारमध्ये दिवाळीचा उत्साह शिगेला

पणत्यांची रोषणाई आणि खरेदीची धामधूम

वसई, ता. ५ (बातमीदार) : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर वसई-विरार परिसरात सणाची लगबग वाढली असून, बाजारपेठा खरेदीदारांच्या गर्दीने फुलल्या आहेत. घरोघरी पणत्यांची रोषणाई, आकाशकंदील आणि आकर्षक सजावटीमुळे परिसरात उत्सवी वातावरण निर्माण झाले आहे. यंदा पारंपरिक मातीच्या पणत्यांसह नक्षीदार व पर्यावरणपूरक पणत्यांना ग्राहकांची पसंती मिळत आहे. वसई, विरार आणि नालासोपारा येथील बाजारपेठांत कपडे, दागिने, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, गृहसजावटीचे साहित्य आणि पूजासाहित्य खरेदीसाठी गर्दी होत आहे. मिठाईच्या दुकानांमध्ये तयार फराळ खरेदीसाठीही ग्राहकांची वर्दळ वाढली आहे.दरम्यान, खरेदीसाठी नागरिकांची गर्दी वाढल्याने वसई-माणिकपूर, एव्हरशाइन, सातिवली, नालासोपारा, तुळींज, आचोळे तसेच विरार पूर्व-पश्चिम भागांत सायंकाळी वाहतूक कोंडी होत आहे. पोलिसांकडून वाहतूक नियंत्रणासाठी बंदोबस्त ठेवण्यात आला असला, तरी नागरिकांना कोंडीचा सामना करावा लागत आहे.

पूजा साहित्याच्या दरात वाढ
गतवर्षीच्या तुलनेत यंदा पूजा साहित्याच्या किमतीत १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. दिवाळीच्या १५ दिवस आधीच सुरू होणारी खरेदी यंदा उशिरा सुरू झाली असून, ग्राहकांची गर्दी आता वाढू लागली आहे, असे व्यावसायिक विजय शर्मा यांनी सांगितले.

पूजा साहित्याचे दर
साहित्य जुना दर सध्याचा दर
तांब्याच्या वस्तू ₹१,००० ₹१,८००
पितळेच्या वस्तू ₹८५० ₹१,४००
मातीच्या पणत्या (डझन) ₹३६ ₹६०

— विजय शर्मा, व्यावसायिक, वसई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.