अंबोलीतील कीनन-रुबेन हत्या प्रकरण :

अंबोलीतील कीनन-रुबेन हत्या प्रकरण :
Published on: 

अंबोली हत्याकांडातील
तिघांचे दाेषत्व कायम

एकाची जन्मठेप २० वर्षांवर; दोघे हत्येच्या आरोपातून मुक्त

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : पंधरा वर्षांपूर्वी अंधेरीतील अंबोली येथे मैत्रिणींची छेड काढणाऱ्यांना विरोध केल्यामुळे कीनन सँटोस आणि रुबेन फर्नांडिस या दोघांची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी विशेष न्यायालयाने आरोपींना दोषी ठरवण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने गुरुवारी कायम ठेवला. मात्र, मुख्य आरोपी जितेंद्र राणा याची जन्मठेपेची शिक्षा २० वर्षांच्या कारावासात रूपांतरित केली, तर अन्य दोघांची हत्येच्या आरोपातून मुक्तता केली.

याप्रकरणी निर्णय देताना जितेंद्र राणा याला हत्येप्रकरणी दोषी ठरवण्याचा निर्णय न्या. मकरंद कर्णिक आणि न्या. संदेश पाटील यांच्या खंडपीठाने कायम ठेवला. त्याच वेळी २०१६ मध्ये विशेष न्यायालयाने त्याला सुनावलेली जन्मठेपेची शिक्षा २० वर्षांच्या कारावासात रूपांतरित केली. सुनील बोथ आणि दीपक पिवाल यांची हत्येच्या आरोपातून मुक्तता करताना त्यांच्याविरुद्धचा हा आरोप सिद्ध झालेला नसून त्यांना साधी दुखापत पोहोचवण्याच्या आरोपाखाली दोषी ठरवताना त्यांना सुनावलेली एक वर्षाची शिक्षाही कायम ठेवली.

मुंबईतील अंधेरीतील अंबोली येथे २० ऑक्टोबर २०११ मध्ये मैत्रिणींची छेड काढणाऱ्यांना जाब विचारल्यामुळे आरोपींनी कीनन सँटोस (२४) आणि रुबेन फर्नांडिस (२९) यांची हत्या करण्यात आली होती. २०१६ मध्ये विशेष न्यायालयाने याप्रकरणी जितेंद्र राणा, सतीश दुळगज, सुनील बोथ आणि दीपक पिवाल यांना हत्येसह इतर गुन्ह्यांसाठी दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. आरोपींपैकी सतीश दुळगजचा मृत्यू झाला आहे. यात विशेष न्यायालयाने राणा आणि दुळगज यांना हत्येव्यतिरिक्त विनयभंगाच्या आरोपाअंतर्गतही दोषी ठरवले होते. याप्रकरणी खंडपीठाने राणाला हत्येप्रकरणी दोषी ठरवण्याचा निर्णय कायम ठेवला. घटनेच्या वेळी राणा २५ वर्षांचा होता. ही बाब लक्षात घेता, त्याला सुनावली गेलेली जन्मठेपेची शिक्षा कमी करून २० वर्षांच्या कारावासात रूपांतरित करत आहोत. तथापि, त्यात कोणतीही सवलत मिळणार नसल्याचेही खंडपीठाने स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.