

उल्हासनगर, ता. ६ (बातमीदार) : शिवसेना ठाकरे पक्षाच्या युवासेनेची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी कल्याण पूर्व, उल्हासनगर आणि अंबरनाथ विधानसभा क्षेत्रांतील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाई यांच्या आदेशानुसार, कल्याण जिल्हाप्रमुख शरद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. त्यामुळे स्थानिक पातळीवर युवासैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
उल्हासनगर येथील सार्वजनिक मित्रमंडळाच्या सभागृहात पदनियुक्तीचा कार्यक्रम पार पडला. या वेळी जिल्हाप्रमुख शरद पाटील, उपजिल्हाप्रमुख रमेश डोंगरे, अनिल भोईर, भीमसेन मोर, राजेंद्र शाहू, विधानसभा प्रमुख जानू मानकर, महानगरप्रमुख आबा साबळे, अंबरनाथ पश्चिमचे शहरप्रमुख संदीप पगारे, अंबरनाथ पूर्वचे शहरप्रमुख संतोष शिंदे, कल्याण पूर्वचे शहरप्रमुख हेमंत चौधरी, उल्हासनगर पश्चिमचे शहरप्रमुख शिवाजी जावळे, उल्हासनगर पूर्वचे शहरप्रमुख प्रशांत धांडे, तालुकाप्रमुख सुरेश पाटील, उपतालुकाप्रमुख प्रभाकर पाटील आणि युवासेनेचे कल्याण पूर्व शहर अधिकारी नीरज कुमार उपस्थित होते.
कल्याण पूर्व लोकसभा स्तर
- जिल्हा समन्वयक अधिकारी : प्रवीण गोसावी
- जिल्हा संघटक अधिकारी : चंद्रकांत भोईर, ॲड. विनोद जावळे
- जिल्हा सचिव : ॲड. राजप्रकाश महाडिक
अंबरनाथ विधानसभा स्तर
- विधानसभा अधिकारी : महेश दुरगुडे
- विधानसभा समन्वयक : बचितर सिंग रहाल
- शहर अधिकारी : प्रतीक लोटलीकर
- उपशहर अधिकारी : अजय मोरे, ओम घोणे
- विभाग अधिकारी : हर्ष मांडवकर
- शाखा अधिकारी : रोहन साळवी
उल्हासनगर पूर्व स्तर
- शहर अधिकारी : ॲड. दाहिर रामटेके
- शहर समन्वयक : अजय भीमसेन मोरे
- डिजिटल समन्वयक : अभिषेक मोरे
- शहर संघटक : निरंजन पाटील
- उपशहर अधिकारी : व्यंकेश गुरव, महेश घोरपडे
- विभाग अधिकारी : अभिषेक अटकळे, प्रेम पाटील, प्रथमेश नवसे, जय मोरे, पालानी पांडी
- उपविभाग अधिकारी : सुमित खत्री, अजित नायडू, अक्षय ताजपुरे
- शाखा अधिकारी : विशाल पत्रा
उल्हासनगर पश्चिम स्तर
- शहर अधिकारी : ॲड. महेश फुंदे
- विभाग प्रमुख : विकास दगडू हनवते, संतोष जानू डुकले
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.