

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ९ : महानगर गॅस कंपनीच्या नावाने आलेल्या पत्राचा आधार घेत सायबर चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाची सहा लाख ५८ हजार २९६ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार वर्तकनगर येथे समोर आला आहे. गॅस ग्राहकाच्या नावात बदल करण्यासाठी अवघे १३ रुपये शुल्क भरण्याच्या बहाण्याने भामट्यांनी त्यांना बनावट लिंक पाठवून बँक खात्यांतील रक्कम लंपास केली. याप्रकरणी वर्तकनगर पोलिस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोखरण रोड क्रमांक १ परिसरात राहणारे रत्नाकर बट्टापाडी (७७) यांना २५ ऑक्टोबरला महानगर गॅस कंपनीच्या नावाने पत्र मिळाले होते. त्यामध्ये मोबाईल क्रमांक आणि ई-मेल अद्ययावत करण्याबाबत सूचना होत्या. यासंदर्भात पत्रावरील क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर १ नोव्हेंबरला एका व्यक्तीने महानगर गॅस कार्यालयातून बोलत असल्याचे सांगून त्यांना लिंक पाठवली. नावात बदल करण्यासाठी १३ रुपये भरण्यास सांगण्यात आले. बट्टापाडी यांनी लिंक उघडून प्रथम कॅनरा बँक आणि त्यानंतर कर्नाटक बँकेच्या डेबिट कार्डची माहिती भरली. मात्र, व्यवहार पूर्ण न झाल्याचे भासवण्यात आले. त्यांनी ओटीपी कोणालाही न सांगता फोन बंद केला. मात्र, दुसऱ्याच दिवशी त्यांच्या दोन्ही खात्यांतून अनुक्रमे सहा लाख ३४ हजार ५०८ रुपये आणि २३ हजार ७८८ रुपये असे एकूण सहा लाख ५८ हजार २९६ रुपये काढल्याचे संदेश आले. त्यानंतर त्यांनी सायबर तक्रार नोंदवली असून, दोन अनोळखी मोबाईल क्रमांकांवरून संपर्क साधणाऱ्यांविरोधात तक्रार दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.