बांबू उद्योगातून समृद्धीची संधी

बांबू उद्योगातून समृद्धीची संधी
Published on: 

बांबू उद्योगातून समृद्धीची संधी
शेतकऱ्यांना सात लाखांचे अनुदान; शिरगावात सुविधा केंद्राचे भूमिपूजन
मुरूड, ता. ६ (बातमीदार) : बांबू लागवड आणि त्यावर आधारित प्रक्रिया उद्योगातून शेतकऱ्यांना दीर्घकालीन उत्पन्नाचे साधन उपलब्ध होऊ शकते. व्हीबीजी रामजी योजनेतून अडीच एकर क्षेत्रावर बांबू लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना सात लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. बांबू उद्योगाच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यात स्वतंत्र अर्थव्यवस्था निर्माण करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांनी केले.
मुरूड तालुक्यातील शिरगाव येथे ग्रीन केन बांबू वर्ल्ड असोसिएशनच्या सामाईक सुविधा केंद्राचे भूमिपूजन करताना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल, तहसीलदार आदेश डफळे, सभापती निलेश घाटवळ आदी उपस्थित होते.
बांबू लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना चार वर्षांच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने सात लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. चार ते पाच वर्षांनी बांबूची कापणी करता येते. त्यापासून ग्लास, पेन, टूथब्रश, कंगवे, खुर्च्या आणि सजावटीच्या वस्तू तयार करता येतात. सुविधा केंद्रामुळे कारागिरांना आधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध होऊन उत्पादनांना मूल्यवर्धन करता येईल. टिश्यू कल्चर प्रयोगशाळेसाठी ५० लाख रुपयांच्या मदतीबाबतही सकारात्मक विचार करण्यात येईल, असे गोगावले यांनी सांगितले.

स्थानिक उत्पादनाला चालना
जिल्ह्यात ३२ लाख बांबू रोपांचे वितरण झाले असून, ८११ ग्रामपंचायतींमध्ये लागवड करण्यात आली आहे. केंद्रासाठी आठ कोटी दहा लाख रुपयांचा प्रकल्प मंजूर असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.