

कांदिवली, ता. ६ (बातमीदार) : कांदिवली पश्चिम येथील महावीर नगर सिग्नल चौकातील अंतरावीर कल्पना चावला यांच्या नावाने सुशोभीकरण करण्यात आलेल्या चाैकाची सध्या दयनीय अवस्था झाली आहे. चाैकावरील दोन अंतराळवीरांपैकी एका वीराचा पुतळा गायब झाला असून, दुसऱ्या बाजूला व्यावसायिकांनी सामान ठेवले आहे. तर एका आइस्क्रीम विक्रेत्याने जाहिरातीसाठी चक्क आइस्क्रीमचा कोन लावला आहे. शिवाय बेटावरील नावाची अक्षरेही निखळली आहेत. त्यामुळे पालिकेच्या दुर्लक्षाबद्दल नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
महावीर नगरमधून सलग चार वेळा मोठ्या मताधिक्याने निवडून आलेल्या तत्कालीन दिवंगत नगरसेविका व उपमहापौर शैलजा विजय गिरकर यांच्या संकल्पनेतून पालिकेच्या माध्यमातून या बेटाची निर्मिती करण्यात आली होती. १ जुलै २००७ला खगोलशास्त्रज्ञ डॉ. जे. जे. रावल यांच्या हस्ते या चौकाचे उद्घाटन झाले होते.
भारताच्या पहिल्या महिला अंतराळवीर कल्पना चावला यांचा जन्म १७ मार्च १९६२ला झाला. १ फेब्रुवारी २००३ला स्पेस शटल कोलंबिया दुर्घटनेत त्यांचे निधन झाले. त्यांचे कार्य आणि प्रेरणादायी विचार आजही विद्यार्थ्यांना स्वप्ने पाहण्याची व ती पूर्ण करण्यासाठी मेहनत घेण्याची प्रेरणा देतात.
अवघ्या सहा महिन्यांतच चाैकाची अवस्था पुन्हा बिकट झाली आहे. पालिकेने तातडीने पुतळा बसवावा, अतिक्रमण हटवावे आणि बेटाची स्वच्छता व सुशोभीकरण करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
पालिकेने तातडीने अंतराळवीर कल्पना चावला चौकाची डागडुजी करून साफसफाई करावी.
- प्रमोद घाग, अध्यक्ष, डहाणूकरवाडी मंडळ
चाैकाची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना सांगून लवकरच साफसफाई करण्यात येईल.
- लीना देहेरकर, अध्यक्षा, प्रभाग समिती
कांदिवली : अंतराळवीर कल्पना चावला चाैकाची दुरवस्था झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.