

कल्याण, ता. ६ (बातमीदार) : पूर्वेकडील तिसगाव नाका परिसरातील सहजीवन रेसिडेंसी सोसायटीच्या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामावरून नवीन वाद निर्माण झाला आहे. संबधित जागेच्या मालकांनी या कामाला विरोध दर्शवला असून, जागा मालक आणि विकसक यांच्यात संघर्ष पेटल्याचे चित्र समोर आले आहे. याप्रकरणी केलेल्या पत्रव्यवहाराच्या अनुषंगाने तातडीने सुनावणी घेण्यात यावी, अशी मागणी जागा मालकांकडून करण्यात येत आहे. मात्र पोलिस बंदोबस्तात या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले.
या वादादरम्यान जागा मालकांनी संबंधित यंत्रणांवर आणि विकसकांवर गंभीर दावे केले आहेत. योग्य प्रक्रिया न राबवता रस्ता डांबरीकरणाचे काम रेटण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा जागा मालकांनी केला आहे. दुसरीकडे, यंत्रणा व विकसकांनी हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. आपल्यावरील सर्व आरोप निराधार असून नियमानुसारच काम सुरू असल्याचे स्पष्टीकरण देण्यात येत आहे. या संपूर्ण वादात स्थानिकांचे मात्र चांगलेच हाल होत होते. मात्र, जागा मालकांनी स्पष्ट केले आहे की, आमचा विकासकामांना कोणताही विरोध नाही. परंतु, मालकी हक्काच्या आणि कायदेशीर मुद्द्यांचा विचार न करता सुरू असलेले काम अन्यायकारक आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने यात लक्ष घालून जागा मालक, स्थानिक रहिवासी आणि विकासक या तिन्ही घटकांना एकाच व्यासपीठावर एकत्र आणावे आणि चर्चा करून यावर तत्काळ योग्य तोडगा काढावा, अशी मागणी जागा मालकांकडून करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.