

अकरा जणांना गंडा घालणारा मनीष डगलिया अटकेत
तब्बल ३० कोटींची फसवणूक
चेंबूर, ता. ६ (बातमीदार) : तब्बल ३० कोटी रुपयांच्या आर्थिक फसवणूक प्रकरणाचा शिवाजीनगर पोलिसांनी तपास सुरू केला असून, याप्रकरणी मनीष ताराचंद डगलिया याला अटक करण्यात आली आहे. या आर्थिक गैरव्यवहारात तब्बल ११ जणांची फसवणूक झाल्याचे तक्रारीतून समोर आले आहे. दरम्यान, आरोपीचा साथीदार कल्पेश दरबार फरार असून, त्याचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितांनी केलेल्या तक्रारींच्या आधारे या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला. प्राथमिक तपासात सुमारे ३० कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी मनीष ताराचंद डगलिया याला ताब्यात घेऊन अटक केली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणुकीची कोट्यवधी रुपयांची रक्कम नेमकी कुठे वळविण्यात आली, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी आरोपीशी संबंधित बँक खाती, आर्थिक व्यवहार आणि कॉर्पोरेट नेटवर्कची तपासणी सुरू केली आहे. या आर्थिक गैरव्यवहारात आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच फसवणुकीची रक्कम अन्य खात्यांमध्ये हस्तांतरित करण्यात आली आहे का, याचाही तपास केला जात आहे. दरम्यान, या प्रकरणातील फरार साथीदार कल्पेश दरबार याचा शोध घेणे आणि फसवणुकीची संपूर्ण रक्कम शोधून काढणे, हे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. अटक करण्यात आलेल्या डगलियाची कसून चौकशी सुरू असून, पुढील तपास शिवाजीनगर पोलिस करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.