

मुरबाडच्या भेंडीला परदेशी बाजारपेठेची पसंती
लागवडीचा हंगाम जोमात; शेतकऱ्यांकडून मशागतीला वेग
मुरबाड, ता. ८ (वार्ताहर) : मुरबाड तालुक्यातील भेंडीला स्थानिक बाजारपेठेसह परदेशातही मागणी असल्याने यंदाच्या हंगामासाठी शेतकरी सज्ज झाले आहेत. तालुक्यात भेंडी लागवडीच्या कामांना वेग आला असून, शेतांमध्ये मशागत, वाफे तयार करणे आणि बियाणे पेरणीची कामे सुरू झाली आहेत. निर्यातीमुळे या पिकाला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, शेतकऱ्यांना यंदा चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा आहे.
आंबळे, शिवळे, सरळगाव, टोकावडे, मढ, सिंगापूर, धसई, सोनावळे आणि पळू यांसह तालुक्यातील अनेक गावांमध्ये भेंडीची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. सध्या काही शेतांमध्ये पेरणी पूर्ण झाली असून, काही ठिकाणी रोपे उगवू लागली आहेत. दर्जेदार बियाणे, खत व्यवस्थापन, पाणीपुरवठा आणि कीड नियंत्रणावर शेतकरी भर देत आहेत.
मुरबाडच्या भेंडीला मुंबई, ठाणे, कल्याणसह प्रमुख बाजारपेठांमध्ये मागणी आहे. निर्यातीच्या माध्यमातून परदेशातही या भेंडीला स्थान मिळत असल्याने या पिकातून आर्थिक उत्पन्नाची चांगली संधी निर्माण झाली आहे.
मात्र, बियाणे, खते, औषधे, मजुरी आणि वाहतूक खर्चात वाढ होत असल्याने शेतकऱ्यांना उत्पादनाला योग्य भाव मिळण्याची अपेक्षा आहे. कृषी विभागाचे आधुनिक तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन, दर्जेदार बियाणे आणि निर्यातीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध झाल्यास भेंडी उत्पादनाला आणखी चालना मिळू शकते.
भेंडीची वैशिष्ट्ये
- मुंबई, ठाणे, कल्याणच्या बाजारपेठेत मागणी
- परदेशातही निर्यातीद्वारे पोहोच
- तालुक्यातील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर लागवड
- भाजीपाला शेतीतून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.