

कोपरखैरणे, ता. ८ (बातमीदार) : नवी मुंबई शहरात पावसाळ्यात उद्भवणाऱ्या पूरस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासह सखल भागातील पाण्याचा निचरा जलदगतीने करण्यासाठी नवी मुंबई पालिकेच्या अग्निशमन विभागाच्या ताफ्यात पाच अत्याधुनिक डीवॉटरिंग वाहनांचा समावेश करण्यात येणार आहे. या वाहनांच्या खरेदीसाठी सात कोटी दोन लाख १० हजारांचा खर्च अपेक्षित असून, त्यास महासभेत प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे.
पाच डीवॉटरिंग वाहनांच्या खरेदीसाठी महापालिकेकडून चार दरपत्रके मागविण्यात आली होती. त्यापैकी प्राप्त झालेल्या न्यूनतम दरपत्रकानुसार एका डीवॉटरिंग वाहनाची किंमत एक कोटी १९ लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. अशा पाच वाहनांसाठी पाच कोटी ९५ लाख रुपये खर्च अपेक्षित असून, त्यावर १८ टक्के जीएसटीचे एक कोटी सात लाख १० हजार रुपये आकारण्यात येणार आहेत. त्यामुळे एकूण खरेदी खर्च सात कोटी दोन लाख १० हजार रुपये होणार आहे. पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे रस्ते, सखल वस्त्या तसेच नागरी वसाहतींमध्ये साचणाऱ्या पाण्याचा जलदगतीने निचरा करण्यासाठी ही वाहने उपयुक्त ठरणार आहेत. आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन दलाकडून नागरिकांना तातडीने मदत पोहोचविणे शक्य होणार आहे.
प्रतिमिनिट १० हजार लिटर पाणीउपसा
या वाहनांमध्ये प्रतिमिनिट १० हजार लिटर पाणी उपसण्याची क्षमता असलेला ऑटो-प्राइम पंप, ५०० लिटर क्षमतेची स्टेनलेस स्टील इंधन टाकी, गंजरोधक बॉडी, इलेक्ट्रिक होज रील्स, २.५ मीटर उंचीचा एलईडी लाइट मास्ट आणि सहा टन क्षमतेची हायड्रॉलिक विंच यांसारख्या अत्याधुनिक सुविधा असणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.