लोखंडी पट्टीने मारहाण करून पिता-पुत्र जखमी

लोखंडी पट्टीने मारहाण 
करून पिता-पुत्र जखमी
Published on: 

अंबरनाथ, ता. ८ (वार्ताहर) : मुलांमधील खेळण्याच्या किरकोळ वादाचे पर्यवसान दोन कुटुंबांतील हाणामारीत झाल्याची घटना शनिवारी (ता. ७) अंबरनाथ पूर्वेतील गावदेवी मंदिर परिसरात घडली. या वादात महिलांसह पुरुषांनाही मारहाण करण्यात आल्याची तक्रार असून, लोखंडी पट्टीने केलेल्या मारहाणीत पिता-पुत्र जखमी झाल्याची तक्रार पोलिसांत करण्यात आली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गावदेवी मंदिरासमोर आणि शिवसेना शाखेजवळ शनिवारी सायंकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. रवी शिवबहादूर पाल यांच्या भाचा अरव आणि शांताराम ससाणे यांच्या मुलामध्ये खेळण्यावरून किरकोळ वाद झाला होता. या वादातून दोन्ही कुटुंबांमध्ये बाचाबाची सुरू झाली.
दरम्यान, शांताराम ससाणे यांच्या पत्नी निर्मला, मुलगी आणि हिंमत ससाणे यांच्या पत्नी उज्ज्वला यांनी पाल यांच्या आईला व वहिनीला हाताने मारहाण करून शिवीगाळ केल्याचा आरोप आहे, तर हिंमत ससाणे याने लोखंडी पट्टीने फिर्यादी रवी पाल आणि त्यांच्या वडिलांना मारहाण करून जखमी केल्याचे तक्रारीत नमूद आहे. याप्रकरणी उज्ज्वला ससाणे, निर्मला ससाणे आणि शांताराम ससाणे यांची मुलगी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.