

सन्मान योजनेपासून पात्र लाभार्थी वंचित
दिव्यांगांच्या सर्वेक्षणाची मागणी
नेरूळ, ता. ९ (बातमीदार) : नवी मुंबईतील दिव्यांग नागरिकांचे नव्याने सर्वेक्षण करून विभागनिहाय अचूक आकडेवारी निश्चित करावी आणि पात्र लाभार्थ्यांना ‘दिव्यांग सन्मान योजने’चा लाभ द्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते निलेश कचरे यांनी महापालिका आयुक्त आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे नुकतीच निवेदनाद्वारे केली आहे.
दिव्यांग नागरिकांना स्वावलंबी बनवून त्यांच्या कुटुंबांना आर्थिक आधार देण्यासाठी महापालिकेने दिव्यांग सन्मान योजनेंतर्गत ३३० लाभार्थ्यांना स्टॉलचे वितरण केले आहे. मात्र, शहरातील अनेक पात्र दिव्यांग नागरिक अद्याप या लाभापासून वंचित आहेत. अनेकांनी अर्ज करूनही सर्वेक्षण आणि पात्र लाभार्थ्यांची अद्ययावत यादी उपलब्ध नसल्याने त्यांना योजनेचा लाभ मिळत नसल्याचे कचरे यांनी निवेदनात नमूद केले आहे.
दिव्यांग, गतिमंद तसेच विविध शारीरिक अडचणी असलेल्या नागरिकांच्या कुटुंबांना आर्थिक आणि सामाजिक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा कुटुंबांना आर्थिक पाठबळ देण्याबरोबरच स्वावलंबनाची संधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यामुळे नव्याने सर्वेक्षण करून विभागनिहाय लाभार्थ्यांची संख्या निश्चित करावी आणि त्यानुसार निधीची तरतूद करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, यापूर्वी योजनेचा लाभ घेतलेले आणि लाभाच्या प्रतीक्षेत असलेले पात्र दिव्यांग नागरिक यांची माहिती संकलित केली जाईल. भविष्यात कोणताही पात्र लाभार्थी योजनेपासून वंचित राहणार नाही, यासाठी आवश्यक सूचनांची दखल घेतली जाईल, असे महापालिकेच्या ईटीसी विभागाच्या संचालिका डॉ. अनुराधा बाबर यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.