

रांगोळीच्या रंगांतून साकारले कलाविश्व
देवदेवतांपासून महापुरुषांच्या व्यक्तिचित्रांपर्यंत विविध कलाकृतींचा समावेश
पनवेल, ता. ९ (बातमीदार) ः रांगोळीच्या विविध रंगछटांतून साकारलेले देवदेवता, थोर महापुरुष, व्यक्तिमत्त्वे, निसर्गचित्रे आणि सामाजिक विषयांवरील विलोभनीय कलाकृतींचा अनोखा आविष्कार पनवेलकरांना अनुभवायला मिळत आहे. व्ही. के. ७५ सामाजिक मंडळ आणि रंगदीप क्रिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने या रांगोळी प्रदर्शनाचे नागरिकांसाठी विनामूल्य आयोजन केले आहे.
या प्रदर्शनात गणपती, श्रीविष्णू, श्रीराम, शिव-पार्वती, श्रीकृष्ण यांसारख्या धार्मिक विषयांवरील रांगोळ्यांसह नाना पाटेकर, स्मिता पाटील, मोहम्मद रफी, आशा भोसले, भगतसिंग, सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले अशा विविध मान्यवरांची व्यक्तिचित्रे रांगोळीतून साकारण्यात आली आहेत. तसेच भीमाशंकरचे जंगल, दुष्काळ, युद्ध, प्राणी वाचवा, आजचा भारत, प्रोटेस्ट आणि चांदण्यातली दिवाळी अशा सामाजिक व निसर्गविषयक संकल्पनांनाही कलात्मक स्वरूप देण्यात आले आहे. या प्रदर्शनात शरयू घरत, अमित राजे, रितू पर्णा, मनोज भोपी, नेहा धामणकर, तनिष्का नवाळे, कशिश तीखे, आकांक्षा भोईर-पॉल, नथुराम भेंडखळे, कीर्ती घरत, नेहा घरत, खुशी म्हात्रे, चंद्रकांत जाधव, डॉ. अमोल सलागरे, डॉ. जयदीप शिगवण, ॲड. प्रकाश नवाळे, तन्वी भोपी, जगदीश राऊत, ज्ञानेश्वर कारेकर, कल्पेश माळी आणि जॉन्सन पॉल या कलाकारांच्या कलाकृती पाहण्याची संधी मिळणार आहे. पनवेलमधील शिवाजी रोडवरील सी.के.पी. हॉल येथे, उज्ज्वल फोटो स्टुडिओच्या शेजारी हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.