

भिवंडी, ता. ९ (बातमीदार) : दिवाळीनिमित्त महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने (महावितरण) थकीत वीजबिल असलेल्या ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. महावितरण कंपनीने अभय योजना २०२६-२७ सुरू केली आहे. ६ नोव्हेंबरपासून लागू झालेली ही योजना १५ जानेवारीपर्यंत सुरू राहील. याअंतर्गत थकीत वीजबिलांवरील १०० टक्के व्याज आणि विलंब शुल्क माफ केले जाईल. त्याचबरोबर एक रकमी पेमेंट करणाऱ्या पात्र ग्राहकांना मूळ थकीत रकमेवर २० टक्क्यांपर्यंत सूटही मिळणार आहे.
योजनेअंतर्गत, कमी दाबाच्या वीजग्राहकांना थकबाकीच्या कालावधीनुसार १० ते २० टक्के सवलत मिळेल. ज्या ग्राहकांचा वीजपुरवठा तीन वर्षांपासून खंडित आहे, त्यांना १० टक्के सवलत दिली जाईल आणि ज्या ग्राहकांचा वीजपुरवठा तीन वर्षांपेक्षा जास्त काळापासून खंडित आहे, त्यांना २० टक्के सवलत दिली जाईल. इतर कमी-दाब आणि उच्च-दाब ग्राहकांसाठीही, विहित अटींनुसार १० ते १५ टक्के सवलतीची तरतूद आहे. जे ग्राहक एकरकमी रक्कम भरण्यास असमर्थ आहेत, त्यांनाही दिलासा देण्यात आला आहे. कमी-दाब ग्राहक ५० टक्के डाउन पेमेंट करून उर्वरित रक्कम सहा समान व्याजमुक्त हप्त्यांमध्ये जमा करू शकतात. तर, उच्च-दाब ग्राहकांना तीन ते सहा हप्त्यांमध्ये पैसे भरण्याची सुविधा मिळेल. योजनेच्या सुरुवातीच्या टप्प्यात पैसे भरणाऱ्या ग्राहकांसाठी अर्ली बर्ड रिबेट जाहीर करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.