रुग्णांसोबत दिवाळीचा आनंद

रुग्णांसोबत दिवाळीचा आनंद
Published on: 

रुग्णांसोबत दिवाळीचा आनंद
सान्वी सोशल वेल्फेअर ऑर्गनायझेशनचा उपक्रम
मुंबई,‌ ता.‌ ९ : दिवाळी म्हटली की रोषणाई, फराळ आणि आप्तस्वकीयांसोबत साजरा होणारा आनंदाचा क्षण डोळ्यांसमोर येतो. सणाचा हा उत्साह आजारपणामुळे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अनेकांना अनुभवणे शक्य होत नाही. अशाच रुग्णांच्या आयुष्यात काही आनंदाचे क्षण आणण्यासाठी सान्वी सोशल वेल्फेअर ऑर्गनायझेशनने टाटा मेमोरियल रुग्णालयात सलग १३व्या वर्षी दिवाळी साजरी केली.
या वेळी अभिनेत्री शिखा मल्होत्राने गाणी सादर करीत रुग्णांचे मनोरंजन केले. तिच्या संगीत सादरीकरणामुळे रुग्णालयातील वातावरण काही काळ उत्साहाने भरून गेले. ईशा रावत यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या कार्यक्रमात शिखाने रुग्णांसोबत वेळ घालवला. गीत-संगीताच्या माध्यमातून त्यांनी रुग्णांना विरंगुळ्याचे क्षण दिले. या वेळी महिला रुग्णांना साड्यांचे वाटप करण्यात आले, तसेच रुग्णालयातील सर्व रुग्णांना भोजन देण्यात आले.
या अनुभवाबद्दल शिखा मल्होत्रा म्हणाली, ‘‘रुग्णांसोबत दिवाळी साजरी करणे माझ्यासाठी भावनिक आणि संस्मरणीय अनुभव होता. त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून खूप आनंद झाला. संगीत आणि प्रेमाचे काही क्षण एखाद्याच्या आयुष्यात सकारात्मकता आणू शकतात.’’ या कार्यक्रमाला संस्थेचे स्वयंसेवक आकाश अहेर, शीतल अहेर, अभिनेत्री शिखा मल्होत्रा आणि टाटा मेमोरियल रुग्णालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. टाटा मेमोरियल रुग्णालय, लिटिल मोर आणि आहुजा ट्रस्ट यांच्या सहकार्याने हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. मनोरंजनाच्या माध्यमातून रुग्णांना दिलासा देण्याचा हा उपक्रम संस्थेच्या सामाजिक कार्याचा एक भाग ठरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.