बेघर मुलांची आनंददायी दिवाळी

बेघर मुलांची आनंददायी दिवाळी
Published on: 

बेघर मुलांची आनंददायी दिवाळी
जनता जागृती मंचाचा १२ वर्षांपासून उपक्रम
जोगेश्वरी, ता. ९ (बातमीदार) : सणांचा आनंद समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावा, या उद्देशाने जोगेश्वरी पूर्वेतील जनता जागृती मंचाच्या वतीने बेघर कुटुंबांतील मुलांसोबत दिवाळी संध्या हा उपक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. शनिवारी (ता. ७) सुभाषनगर, बांद्रेकर वाडी येथे आयोजित या कार्यक्रमात ५० हून अधिक मुलांनी दिवाळीचा आनंद लुटला.
या वेळी मुलांना फटाके, दिवाळीचा फराळ, मिठाई आणि कंदिलांचे वाटप करण्यात आले. जनता जागृती मंचाच्या वतीने गेल्या १२ वर्षांपासून सुभाषनगर, बांद्रेकर वाडी परिसरातील बेघर कुटुंबांतील मुलांसाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यंदाही मुलांसोबत ध्वनिप्रदूषण न करणाऱ्या भुईचक्र आणि पाऊस यासारख्या फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. तसेच चकली, करंजी, चिवडा, शंकरपाळी यासारख्या फराळासह मोतीचूर लाडू, काजू कतली, म्हैसूर पाक आणि हलवा अशा विविध मिठाईचे वाटप करण्यात आले. प्रत्येक कुटुंबाला एक याप्रमाणे ३० कंदिलांचेही वितरण करण्यात आले. अवघ्या एका आठवड्यात आवश्यक साहित्य आणि आर्थिक मदत उपलब्ध झाल्याने हा उपक्रम यशस्वीपणे पार पडल्‍याचे येथील सामाजिक कार्यकर्ते शिवाजी खैरनार यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.