भातपिकाच्या काढणीची लगबग

भातपिकाच्या काढणीची लगबग
Published on: 

भातपिकाच्या काढणीची लगबग
दिवाळीत धान्य घरात आणण्यासाठी बळीराजाची धडपड
पेण, ता. ९ (वार्ताहर) : दिवाळीच्या सणात धनधान्याची लक्ष्मी घरात आणण्यासाठी पेण तालुक्यातील शेतकऱ्यांची भात कापणी, झोडणी आणि मळणीची लगबग सुरू झाली आहे. यंदा पावसाचा खंड आणि भातपीक ऐन वाढीच्या टप्प्यात असताना पुरेसा पाऊस न मिळाल्याने अनेक भागांतील शेती संकटात सापडली. प्रतिकूल परिस्थितीमुळे उत्पादनावर परिणाम झाला असला, तरी कष्टाळू बळीराजाने हार न मानता हाती आलेले पीक घरात आणण्यासाठी धडपड सुरू ठेवली आहे.
पेण तालुक्यातील खारेपाट तसेच पूर्व भागात भात कापणी, झोडणी आणि मळणीच्या कामांना वेग आला आहे. विशेष म्हणजे दिवाळीच्या सुट्टीतही शेतकरी कुटुंबे शेतीच्या कामात व्यस्त आहेत. तयार झालेले भातपीक वेळेत कापून त्याची मळणी करण्यावर त्यांचा भर आहे. लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर घरात नवीन धान्य आणण्याची परंपरा जपण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. प्रतिकूल हवामानातही आलेले पीक सुरक्षितपणे घरात पोहोचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
दिवाळी आणि नवीन धान्य यांचे ग्रामीण भागात विशेष नाते आहे. लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर शेतातील धान्य घरात आणणे शुभ मानले जाते. त्यामुळे भातकापणीच्या हंगामात शेतकरी कुटुंबांची लगबग वाढते. यंदा उत्पादनावर संकटाचे सावट असतानाही शेतकरी ही परंपरा जपत आहेत.

प्रतिकूलतेतही जिद्द कायम
पावसाच्या अनियमिततेमुळे अनेक शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन मिळालेले नाही. तरीही शेतात तयार झालेले पीक वाया जाऊ नये, यासाठी कापणी आणि मळणीची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. वर्षभराच्या मेहनतीतून मिळालेले धान्य सुरक्षित घरात आणण्याला शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले आहे.
- सागर वाडकर, कृषी अधिकारी, पेण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.