

स्वेलेक्ट राज्यात उभारणार २०० मेगावॉटचे सौर प्रकल्प
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : विजेच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर स्वेलेक्ट एनर्जी सिस्टीम ही कंपनी महाराष्ट्रात ईपीसी तत्त्वावर तब्बल २०० मेगावाॅट क्षमतेचे सौर प्रकल्प उभारणार आहे. पीएम-कुसुम योजनेंतर्गत जळगाव जिल्ह्यात सौर प्रकल्प उभारण्याचे नियोजन असल्याचे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डाॅ. अरूलकुमार शनमुगसुंदरम यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे राज्याच्या हरित ऊर्जा निर्मितीच्या क्षमतेत वाढ होणार आहे.
हरित ऊर्जा क्षेत्रातील आघाडीची कंपनी म्हणून स्वेलेक्ट एनर्जी सिस्टीमला ओळखले जाते. कंपनी जळगाव जिल्ह्यात सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार आहे. सध्या हा प्रकल्प प्राथमिक टप्प्यात असून, कंपनीने प्रकल्प स्थळाची पाहणी पूर्ण केली आहे. त्यानंतर आता सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे डाॅ. अरूलकुमार शनमुगसुंदरम यांनी सांगितले. तसेच केवळ जळगावपुरते मर्यादित न राहता कंपनी राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्येही सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याबाबत संधी शोधत आहे. त्यासाठी योग्य जमिनीची उपलब्धता आणि ग्रीड कनेक्टिव्हिटीचे मूल्यांकन केले जात असून, लवकरच नवीन ठिकाणे निश्चित केली जाणार आहेत.
...
तरंगत्या सौर प्रकल्पाबाबतही चाचपणी
जमिनीवरील सौरऊर्जा प्रकल्पाबरोबरच कंपनीकडून तलावांमध्ये तरंगते सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याच्या दिशेने चाचपणी सुरू आहे. सुमारे १० ते १५ मेगावॉट क्षमतेचा तरंगता सौर प्रकल्प विकसित करण्याचे नियोजन सुरू असून, पुढील सहा महिन्यांत प्रकल्पाचे काम हाती घेतले जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.