

रहेजा गार्डनमधील आग
सहा तासांनी आटोक्यात
४० ते ५० रहिवाशांसह मुक्या जीवांची सुखरूप सुटका
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ९ : ठाण्यातील रहेजा गार्डनमधील कार्लाइल या १७ मजली इमारतीला रविवारी (ता. ८) रात्री आग लागली. इलेक्ट्रिक डक्टमध्ये लागलेली आग सातव्या ते चौदाव्या मजल्यापर्यंत पसरल्याने इमारतीत धुराचे लोट पसरले. अग्निशमन दलाने तब्बल सहा तास प्रयत्न करून सोमवारी (ता. ९) पहाटे अडीचच्या सुमारास आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवले. या वेळी इमारतीत अडकलेल्या ४० ते ५० रहिवाशांसह काही मुक्या जीवांचीही सुखरूप सुटका करण्यात आली.
ठाणे महापालिकेचे अग्निशमन दल, प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्ष, आपत्ती प्रतिसाद दल आणि पोलिसांनी रविवारी रात्री ८.३० वाजता आगीची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. इलेक्ट्रिक डक्टमधून धूरवरील अनेक मजल्यांवर पसरल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते. बचाव पथकांनी इमारतीत अडकलेल्या रहिवाशांना सुरक्षित बाहेर काढले. धुरामुळे श्वास घेण्यास त्रास झालेल्या काही जणांना प्रथमोपचार देण्यात आले. बृहन्मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाचा हायड्रॉलिक प्लॅटफॉर्मही मागवण्यात आला होता. सात ते आठ रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या होत्या. अखेर सहा तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवण्यात यश आले. सुरक्षेच्या दृष्टीने इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारांवर धोकापट्टी लावण्यात आली असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.