गिरगाव ख्रिसमस संगीत महोत्सवाला परवानगी

गिरगाव ख्रिसमस संगीत महोत्सवाला परवानगी
Published on: 

गिरगाव ख्रिसमस संगीत महोत्सवाला परवानगी
पर्यावरण नियमांच्या पालनासह सुरक्षेच्या अटी बंधनकारक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : गिरगाव चौपाटीवर ख्रिसमस संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यास उच्च न्यायालयाने यंदाही ख्रिस्ती समुदायाला नुकतीच सशर्त परवानगी दिली. येत्या १३ डिसेंबर रोजी हा महोत्सव साजरा होणार आहे.

महापालिकेने यावर्षी संबंधित वार्षिक महोत्सवास परवानगी नाकारल्याने प्रभू येशू जन्मोत्सव सार्वजनिक चॅरिटेबल  ट्रस्टने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्या. बर्गिस कुलाबावाला आणि न्या. फरहान दुबाश यांच्या खंडपीठाने चौपाटीवर संगीत महोत्सव आयोजित करण्यासाठी आयोजकांना यापूर्वीही परवानगी दिल्याची बाब प्रामुख्याने विचारात घेतली.  यापूर्वी २०१८ च्या आदेशानुसार, या महोत्सवासाठी ४,१८०.३ चौरस मीटर जागा निश्चित करण्यात आली होती, मात्र या वेळी ट्रस्टने १५ हजार चौरस मीटर जागेच्या वापराची परवानगी न्यायालयाकडे मागितली. त्यावर यापूर्वीही किमान पाच वेळा ट्रस्टला अशाच प्रकारची परवानगी देण्यात आल्याकडे न्यायालयाने आदेशाकडे लक्ष वेधले. २०२३, २०२४ आणि २०२५ मध्ये दिलेल्या आदेशांचा संदर्भ देऊन न्यायालयाने महोत्सवासाठी संबंधित जागेचा वापर करण्यास परवानगी दिली. तथापि, भूतकाळात आयोजकांकडून परवानगी दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त जागेचा वापर केल्याच्या आणि अटींचे उल्लंघन केल्याच्या तक्रारींचीही न्यायालयाने दखल घेतली. दुसरीकडे न्यायालयाने आयोजकांना पर्यावरणविषयक नियमांचे पालन करण्याचे आणि महोत्सवात सहभागी होणाऱ्यांच्या सुरक्षेसाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी खासगी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले.

अटींसह परवानगी
न्यायालयाच्या मागील आदेशांचा संदर्भ लक्षात घेता, याचिकाकर्त्या ट्रस्टला १५ हजार चौरस मीटर जागेवर ‘ख्रिसमस संगीत महोत्सव’ आयोजित करण्याची परवानगी देत असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच, संबंधित प्राधिकरणांना ही जागा त्वरित सीमांकित करण्याचे आदेश दिले. ही परवानगी काही अटींच्या अधीन राहून असल्याचे नमूद करून, ट्रस्टला कोणतीही व्यावसायिक जाहिरात न लावण्याचे त्याचप्रमाणे, अग्निशमन विभाग आणि विद्युत निरीक्षण विभागासारख्या स्थानिक प्राधिकरणांकडून सर्व आवश्यक परवानग्या आणि ना-हरकत प्रमाणपत्रे मिळवणे बंधनकारक असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.