

उल्हासनगर, ता. ११ (वार्ताहर) : शिवसेनेच्या शाखाप्रमुखपदावरून पेटलेल्या वादाचे पर्यवसान चाकूहल्ल्यात झाल्याने उल्हासनगरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मराठा सेक्शन परिसरातील शाखाप्रमुख विशाल बाविस्कर यांच्यावर पाठीमागून चाकूने सपासप वार करण्यात आले. विशेष म्हणजे, या जीवघेण्या हल्ल्याचा शिंदे गटाच्या शिवसेनेच्याच नगरसेवकाच्या पुतण्यावर आरोप असून, घटनेनंतर संशयित आरोपी फरार झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
शिवसेनेच्या शाखाप्रमुखपदावरून निर्माण झालेल्या वादातून मराठा सेक्शन परिसरातील शाखाप्रमुख विशाल बाविस्कर (वय ४४) यांच्यावर चाकूने जीवघेणा हल्ला झाल्याची घटना सोमवारी (ता. ९) मध्यरात्री घडली. या हल्ल्यात त्यांच्या पाठीवर आणि दोन्ही मनगटांवर चाकूचे अनेक वार झाल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणात शिंदे गटाचे नगरसेवक चंद्रशेखर यादव यांचा पुतण्या चिराग याच्यावर हल्ल्याचा संशय आहे. शाखाप्रमुखपद मिळविण्यासाठी विशालने शेखरची मदत घेतल्याच्या मुद्द्यावरून चिरागने त्यांच्याशी वाद घालत जीवे मारण्याची धमकी दिली होती. याबाबत विशालने शेखरकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी चिरागला समज देत त्याच्या कानशिलात लगावली होती. याच रागातून मध्यरात्रीच्या सुमारास जिजामाता गार्डनजवळील आशीर्वाद रुग्णालयासमोर विशालवर पाठीमागून चाकूने हल्ला केल्याचा संशय आहे. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.