ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी ‘बालसंजीवनी’

ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी ‘बालसंजीवनी’
Published on: 

ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी ‘बालसंजीवनी’

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू झाल्याने ऊसतोड मजुरांसोबत स्थलांतरित होणाऱ्या बालकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी राज्यात ‘बालसंजीवनी’ अभियान राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत साखर कारखान्यांचा परिसर आणि उसाच्या शेतांमधील मजुरांच्या तात्पुरत्या वस्त्यांवर जाऊन बालकांची आरोग्य तपासणी, उपचार आणि लसीकरण करण्यात येणार आहे. याबाबत सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी आरोग्य यंत्रणेला निर्देश दिले आहेत.

स्थलांतरामुळे अनेक बालकांना नियमित आरोग्य तपासणी आणि लसीकरणाच्या सुविधा मिळत नाहीत. ही अडचण लक्षात घेऊन राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत (आरबीएसके) बालकांची तपासणी केली जाणार आहे. यामध्ये कुपोषण, रक्तक्षय, बालविकासातील विलंब, जन्मजात व्यंग आणि संसर्गजन्य आजारांची तपासणी करून आवश्यक उपचार केले जातील. अभियानाच्या अंमलबजावणीसाठी राज्यातील सर्व साखर कारखान्यांची यादी तयार करणे, मजुरांच्या पालांचे सर्वेक्षण करणे आणि कारखानानिहाय आरोग्य तपासणी व लसीकरणाचे नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामध्ये आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका आणि कारखाना व्यवस्थापन सहभागी होणार आहेत. आरोग्य यंत्रणेने थेट मजुरांच्या वस्त्यांपर्यंत पोहोचून सेवा द्यावी, जेणेकरून उपचारांसाठी पालकांची होणारी धावपळ थांबेल, हा अभियानाचा उद्देश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.