ठाणेकरांचा श्वास प्रदूषणाच्या विळख्यात!

ठाणेकरांचा श्वास प्रदूषणाच्या विळख्यात!
Published on: 

ठाण्यात हवेचे प्रदूषण कायम!
गुणवत्ता निर्देशांक १४१वर

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ११ : दिवाळी संपली आणि फटाक्यांचा धूरही ओसरला; मात्र ठाणे शहरातील प्रदूषणाची समस्या कायम आहे. बुधवारी (ता. ११) सायंकाळी ५.०५ वाजेपर्यंत शहराचा वायू गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) १४१ नोंदविण्यात आला. हवेची गुणवत्ता मध्यम श्रेणीत असली तरी संवेदनशील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
गेल्या तीन दिवसांची आकडेवारी पाहता प्रदूषणात किरकोळ घट झाली आहे. एक्यूआय ९ नोव्हेंबरला १४५, १० नोव्हेंबरला १४५, तर ११ नोव्हेंबरला १४१ नोंदविण्यात आला. म्हणजेच दोन दिवसांच्या तुलनेत केवळ चार अंशांची सुधारणा झाली आहे. त्यामुळे प्रदूषणाचा धोका अद्याप कायम असल्याचे चित्र आहे. शहरातील वाढती वाहनांची वर्दळ, बांधकामांमधून उडणारी धूळ आणि विकासकामांमुळे हवेच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे. मध्यम श्रेणीतील प्रदूषणाचाही दमा, फुप्फुसांचे विकार आणि हृदयविकार असलेल्या नागरिकांना त्रास होऊ शकतो. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनीही विशेष काळजी घेण्याची गरज आहे, असे तज्ज्ञ सांगतात. श्वसनाचे विकार असलेल्या नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडणे आणि अधिक श्रमाची कामे टाळावीत. आवश्यक असल्यास योग्य मास्क वापरावा. श्वास घेण्यास त्रास किंवा सतत खोकला जाणवल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा. दरम्यान, रस्त्यांवरील धूळ नियंत्रण, बांधकामस्थळी पाण्याची फवारणी आणि वाहनांमधून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी प्रशासनाने प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे.
...
एक्यूआय असा
९ नोव्हेंबर : १४५
१० नोव्हेंबर : १४५
११ नोव्हेंबर : १४१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.