भरधाव दुचाकीच्या अपघातात स्वाराचा मृत्यू

भरधाव दुचाकीच्या अपघातात स्वाराचा मृत्यू
Published on: 

अंबरनाथ, ता. १२ (वार्ताहर) : भरधाव दुचाकीने कंटेनरला धडक दिल्याने भीषण अपघात झाल्याची घटना बुधवारी (ता. ११) अंबरनाथमध्ये घडली आहे. या अपघातात २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी असून, त्याची प्रकृती चिंताजनक असून, रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंबरनाथ पूर्वेतील लोकनगरी रस्त्यावरून भावेष गंगाधर पतंगे (वय २१) हा आपला मित्र मोनिष पद्मनाथ पुजारी (२७) याच्यासह बुधवारी पहाटेच्या सुमारास दुचाकीवरून जात होता. लोकनगरी मैदानाजवळील एसआर पेट्रोलपंपासमोर रस्त्यावर उभ्या असलेल्या कंटेनरला त्यांची दुचाकी धडकली. या अपघातात भावेषला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले, तर मोनिष यालाही गंभीर दुखापत झाली आहे. अपघाताची घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दरम्यान, लोकनगरी रस्त्यावर अरुंद रस्ता आणि पथदिव्यांचा अभाव यामुळे रात्रीच्या वेळी चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असून, या मार्गावर वारंवार अपघात होत आहे. त्यामुळे या मार्गावर आवश्यक सुरक्षा उपाययोजना आणि पुरेशा पथदिवे बसवण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.