

शहापूर, ता. १२ (वार्ताहर) : शहापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापतींविरोधात दाखल झालेला अविश्वास ठराव आज (ता. १२) बहुमताने मंजूर झाला. समितीच्या एकूण १८ संचालकांपैकी भाजपचे सभापती नंदलाल डोहळे यांच्या विरोधात १५ संचालकांनी, तर शिवसेनेचे उपसभापती शरद वेखंडे यांच्याविरोधात १४ संचालकांनी सह्या केल्याने अविश्वास ठराव संमत झाला.
शहापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापतीपदांवर दरवर्षी भाजप-शिवसेना युतीच्या वेगवेगळ्या संचालकांना संधी देण्याचे निश्चित केले आहे, मात्र भाजपचे डोहळे सभापतिपदी, तर शिवसेनेचे वेखंडे उपसभापतिपदावर साडेतीन वर्षे बसले आहेत. त्यामुळे नाराज झालेल्या शिवसेनेच्या संचालकांनी पक्षाच्याच उपसभापतींविरोधातही भूमिका घेऊन दहा दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास ठराव नोंदवला होता. त्यानुसार ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी अविश्वास ठरावावर गुरुवारी बैठक बोलविण्याचे सहाय्यक निबंधक व तहसीलदारांना निर्देश दिले होते.
बाजार समितीच्या सभागृहात गुरुवारी तहसीलदार परमेश्वर कासुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. सभापती डोहळे यांच्या विरोधात १५, तर उपसभापती वेखंडे यांच्या विरोधात १४ संचालकांनी अविश्वास ठराव मंजूर केला. मात्र या ठरावाला सामोरे न जाता सभापती, उपसभापतींसह भाजपचे संचालक महेश पतंगराव यांनी दांडी मारली. बाजार समितीवर १८ पैकी १० संचालकांचे बहुमत असतानाही केवळ तीनच संचालकच सभापती व उपसभापतींकडे राहिल्याने त्यांचे आजच्या अविश्वास ठरावावेळचे पानिपत निश्चित झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.