

धारावीकरांची खड्ड्यांतून सुटका कधी?
तात्पुरत्या डागडुजीने प्रश्न कायम; रस्त्यांच्या नूतनीकरणाची मागणी
धारावी, ता. १२ (बातमीदार) : धारावीतील अंतर्गत रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. विविध रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी खड्ड्यांमध्ये राडारोडा टाकून खड्डे बुजवण्याचा केविलवाना प्रयत्न केला गेला आहे. रस्त्यावरून वाहन चालवताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे, तर पादचाऱ्यांना चालताना त्रास सहन करावा लागत आहे.
पावसाळा जाऊन महिना होत आला. पावसाळ्यात रस्त्यावरील खड्ड्यांचा त्रास स्थानिकांनी सहन केला होता. पावसाळ्यात खड्डे बुजवले जात नव्हते. त्यामुळे पावसाळ्यानंतर रस्ते दुरुस्त होतील अशी स्थानिकांना आशा होती, मात्र रस्ते दुरुस्त झाले नाहीत. पावसाळ्यात काही ठिकाणी रस्त्यांची तात्पुरती डागडुजी करण्यात आली होती. रस्त्यांवरील खड्ड्यातूनच गणरायाचे व देवीचे आगमन व विसर्जन झाले. त्याहीवेळी स्थानिक मंडळांनी व कार्यकर्त्यांनी रस्त्याच्या दुरवस्थेकडे पालिकेचे लक्ष वेधले होते, मात्र पालिकेने धारावीतील तात्पुरती मलमपट्टी करून वेळ मारून नेली होती. पालिकेच्या या कारभारामुळे स्थानिकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.
पावसाळ्यात रस्त्यावरील खड्ड्यांचा त्रास दरवर्षी सहन करावा लागतो, मात्र पावसाळा संपल्यावरही रस्त्यांवरील खड्ड्यांचा त्रास सहन करणे स्थानिकांना भाग पडत आहे. खड्ड्यांमुळे धारावीच्या रस्त्यांची रया गेली आहे. पालिकेने लवकरात-लवकर रस्त्याची डागडुजी व नूतनीकरण करण्याची मागणी होत आहे.
धारावीतील रस्ते कधी अन्य विभागासारखे सुंदर व चांगले होतील याची आम्ही किती काळ वाट पाहायची हेच समजत नाही. चांगले रस्ते तयार झाले पाहिजेत.
- दुर्गा जाधव, स्थानिक रहिवासी
धारावीत गेल्या अनेक वर्षांपासून नव्याने रस्ते बनवले जात नाहीत. जुन्या रस्त्यांची फक्त डागडुजी केली जात असल्याने रस्ते खराब होत आहेत. पालिकेने याकडे गांभीर्याने पाहावे अशी अपेक्षा आहे.
- पारी राजन, समाजसेवक
edit news
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.