

मुंबई, ता. १२ : मुंबई विद्यापीठाच्या सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह, पंडिता रमाबाई मुलींचे वसतिगृह, कर्मवीर भाऊराव पाटील मुलांचे वसतिगृह, महर्षी धोंडो केशव कर्वे मुलींचे वसतिगृह, मादाम कामा मुलींचे वसतिगृह, जगन्नाथ शंकरशेठ मुलांचे वसतिगृह आणि नवीन मुलींच्या वसतिगृहात राहणाऱ्या विविध विद्यार्थ्यांनी दिवाळी उत्साहात साजरी केली.
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र. कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे यांच्यासह विविध वसतिगृहांच्या अधीक्षकांनी वसतिगृहांना भेटी देऊन तेथील विद्यार्थ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी विविध वसतिगृहांत राहणाऱ्या ईशान्य भारतासह देशातील विविध राज्यांतल्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधून दिवाळी फराळाचे वितरण केले.
वसतिगृहात राहणाऱ्या आसाम येथील विद्यार्थीने पारंपरिक पद्धतीने कुलगुरूंचा सत्कार केला. घरापासून दूर असले तरी घरची दिवाळी वसतिगृहात साजरी होत असल्याच्या भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या. वसतिगृहात राहणाऱ्या या सर्व विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शैक्षणिक आणि प्रशासकीय सुविधा पुरविण्यासाठी विद्यापीठ कायमच भर देत असून, लवकरच विद्यानगरी संकुलात नवीन वसतिगृह विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार असल्याचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले.
सेवा विद्यार्थीहितैषी करण्याचा प्रयत्न
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मधील विद्यार्थीकेंद्री, पारदर्शक आणि उत्तरदायी प्रशासनाच्या संकल्पनेला अनुसरून ‘एनईपी कनेक्ट’ उपक्रमांतर्गत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अभिप्रायाच्या आधारे विद्यापीठाच्या प्रशासकीय सेवा अधिक गतिमान, पारदर्शक आणि विद्यार्थीहितैषी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
मुंबई : विद्यापीठाच्या विविध वसतिगृहांत दिवाळी साजरी करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.