

नागरी सुविधांसाठी आक्रमक पवित्रा
नगरसेवक मानकरांच्या पाहणीनंतर प्रशासनाची धावपळ
वसई, ता. १२ (बातमीदार) : वसई-विरार महापालिकेच्या प्रभाग समिती ‘एच’ अंतर्गत येणाऱ्या परिसरात नागरी सुविधांचा बोजवारा उडाल्याने नगरसेवक कल्पेश मानकर यांनी प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. बंद पथदिवे, अस्वच्छता आणि धोकादायक वृक्षांच्या फांद्यांमुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन त्यांनी प्रभागाची प्रत्यक्ष पाहणी केली. या वेळी मूलभूत सुविधांबाबत प्रशासनाच्या उदासीनतेवर त्यांनी नाराजी व्यक्त केली.
पाहणीदरम्यान बंद पथदिवे तातडीने सुरू करणे, परिसरातील कचरा नियमित उचलणे, स्वच्छता राखणे तसेच रहदारीच्या मार्गांवरील धोकादायक वृक्षांच्या फांद्यांची छाटणी करणे, अशा कामांवर त्यांनी भर दिला. नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देऊन सर्व कामे प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
नगरसेवकांच्या या आक्रमक भूमिकेनंतर महापालिका प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. काही ठिकाणी वृक्षछाटणीचे काम हाती घेण्यात आले असून, अस्वच्छता आणि कचऱ्याच्या समस्येवरही तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून नागरी समस्यांचा सामना करणाऱ्या स्थानिक नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन प्रभागाची पाहणी केली. संबंधित विभागांना प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्यानंतर महापालिकेने सकारात्मक प्रतिसाद दिला असून, वृक्षछाटणीसह अन्य कामे करण्याचे आश्वासन दिल्याचे नगरसेवक कल्पेश मानकर यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.