‘जेन-झी’ने साकारली प्रतापगडाची प्रतिकृती

‘जेन-झी’ने साकारली प्रतापगडाची प्रतिकृती
Published on: 

मुंबई, ता. १२ : छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी जोडलेल्या गड-किल्ल्यांविषयीची उत्सुकता नव्या पिढीतही दिसून येते. याच इतिहासाची ओळख करून देण्याच्या उद्देशाने तरुणांच्या एका गटाने प्रतापगडाची प्रतिकृती साकारली आहे. कामाक्षी कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सात तरुणांनी एकत्र येत सुमारे २२ ते २५ दिवसांच्या मेहनतीतून ही प्रतिकृती उभारली. यामध्ये किल्ल्याचे बुरूज, तटबंदी, प्रवेशद्वार, मंदिरे आणि डोंगररांगांचे बारकावे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

या प्रतिकृतीच्या निर्मितीसाठी विटा, लाल माती, शाडू माती, वर्तमानपत्रांचे कागद आणि विविध रंगांचा वापर करण्यात आला. लाल मातीच्या साहाय्याने डोंगरांचा आकार तयार करण्यात आला, तर शाडू मातीपासून बुरुज, तटबंदी, पायऱ्या आणि मंदिरांची रचना करण्यात आली. किल्ल्याच्या विविध भागांचे स्वरूप प्रतिकृतीत उतरवण्यासाठी सदस्यांनी कामाची विभागणी करून एकत्रितपणे प्रयत्न केले. या कामात मिस्त्री काकांनीही बांधकाम आणि रचनेविषयी मार्गदर्शन करत सहकार्य केले. या प्रतिकृतीच्या निर्मितीत अन्वेश कुलकर्णी, सिद्धेश नेवरेकर, आर्यन देसाई, ध्रुव भिंगार्डे, कौशिक निघडे, प्राची माळी आणि आरुषी गोयर सहभागी झाले होते. कामाक्षी कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळत हा उपक्रम पूर्ण केला. गड-किल्ल्यांचा इतिहास केवळ पुस्तकांपुरता मर्यादित न ठेवता तो प्रत्यक्ष कृतीतून समजून घेण्याचा या तरुणांचा प्रयत्न आहे. प्रतापगडाच्या प्रतिकृतीच्या माध्यमातून किल्ल्याची रचना आणि त्याच्याशी जोडलेल्या ऐतिहासिक घटनांची माहिती जाणून घेण्याची संधी मिळत आहे.

मुंबई : ‘जेन-झी’ने प्रतापगडाची प्रतिकृती साकारली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.