वाहतूक नियम पाळा, अनमोल जीव वाचवा

वाहतूक नियम पाळा, अनमोल जीव वाचवा
Published on: 

रस्ता सुरक्षा हाच जीवनरक्षणाचा मंत्र
उल्हासनगर वाहतूक पोलिसांचे विद्यार्थ्यांना धडे

उल्हासनगर, ता. १३ (वार्ताहर) : रस्त्यावरील निष्काळजीची एक छोटीशी चूकही जीवावर बेतू शकते. त्यामुळे वाहतूक नियमांचे पालन ही केवळ कायदेशीर जबाबदारी नसून स्वतःसह इतरांचेही प्राण वाचविण्याची महत्त्वाची खबरदारी आहे, असा संदेश उल्हासनगर वाहतूक पोलिसांनी विद्यार्थ्यांना दिला. वेदांत महाविद्यालयात आयोजित वाहतूक सुरक्षा जनजागृती सेमिनारमध्ये विद्यार्थ्यांना सुरक्षित वाहनचालना, हेल्मेटचा वापर आणि अपघात टाळण्यासाठी घ्यावयाच्या खबरदारीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

वाढते रस्ते अपघात आणि वाहतूक नियमांकडे होणारे दुर्लक्ष लक्षात घेऊन तरुण पिढीमध्ये रस्ता सुरक्षेचे महत्त्व रुजविण्यासाठी उल्हासनगर वाहतूक उपविभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक युवराज सरनोबत यांच्या पुढाकाराने या सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ईगल ब्रिगेड फाउंडेशनचे विश्वनाथ बिलवलकर यांनी विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांची माहिती देत अपघात प्रतिबंधासाठी आवश्यक उपाययोजनांवर प्रकाश टाकला.

दुचाकी चालविताना हेल्मेटचा अनिवार्य वापर करणे, वाहनाचा वेग नियंत्रित ठेवणे, वाहतूक सिग्नलचे पालन करणे आणि वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळणे, या महत्त्वाच्या बाबी विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या. रस्त्यावर स्वतःचीच नव्हे, तर इतरांचीही सुरक्षितता जपण्याची जबाबदारी प्रत्येक वाहनचालकाची असल्याचेही पटवून देण्यात आले.

नियमांचे पालन करण्याचे आवाहन
वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे होणारे अपघात आणि जीवितहानी टाळण्यासाठी प्रत्येकाने वाहतूक शिस्त अंगीकारणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांमध्ये लहान वयापासूनच सुरक्षित वाहनचालनेची संस्कृती रुजविणे आणि जबाबदार नागरिक घडविणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. ‘रस्ता सुरक्षा हीच जीवन सुरक्षा’ हा संदेश देत विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.