मढ -मार्वे रोडवर अवजड वाहनांना प्रवेशबंदी

मढ -मार्वे रोडवर अवजड वाहनांना प्रवेशबंदी
Published on: 

मढ -मार्वे रोडवर अवजड वाहनांना प्रवेशबंदी
छठपूजेनिमित्त १५ नोव्हेंबरपासून वाहतुकीवर निर्बंध
मालाड, ता. १३ (बातमीदार) : छठपूजेनिमित्त मालाड पश्चिमेतील मार्वे बीच आणि अक्सा बीच येथे १५ व १६ नोव्हेंबर २०२६ रोजी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. या दोन्ही समुद्रकिनाऱ्यांवर सुमारे ५० ते ६० हजार भाविक उपस्थित राहण्याचा अंदाज असून, गर्दीचे नियंत्रण आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी मढ -मार्वे रोडवर अवजड वाहनांना प्रवेशबंदी लागू केली आहे.
कांदिवली वाहतूक विभागाच्या हद्दीत येणाऱ्या बाफ हिरा जंक्शन ते अक्सा बीच या मार्गावर १५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजल्यापासून ते १६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या अवजड मालवाहू वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे, मात्र लहान आणि खासगी वाहनांची वाहतूक नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे.
या निर्बंधातून पोलिस, अग्निशमन दल, रुग्णवाहिका तसेच दूध, भाजीपाला, फळे, बेकरी उत्पादने आणि पेट्रोल, डिझेल व एलपीजीची वाहतूक करणाऱ्या वाहनांना वगळण्यात आले आहे.
पश्चिम उपनगराचे वाहतूक पोलिस उपायुक्त अजीत बोऱ्हाडे यांनी यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. वाहनचालकांनी वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोटार वाहन कायदा १९८८ अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचेही अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.