नवी मुंबईत प्रथमच जिल्हास्तरीय मराठी साहित्य संमेलन

नवी मुंबईत प्रथमच जिल्हास्तरीय मराठी साहित्य संमेलन
Published on: 

नवी मुंबईत प्रथमच जिल्हास्तरीय मराठी साहित्य संमेलन
२१ व २२ नोव्हेंबरला नेरूळ येथे आयोजन; नाटककार योगेश सोमण अध्यक्षस्थानी
तुर्भे, ता. १३ (बातमीदार) : मराठी साहित्य, भाषा आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी नवी मुंबईत प्रथमच जिल्हास्तरीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. नेरूळ येथील तेरणा सभागृहात शनिवार (ता. २१) आणि रविवार (ता. २२) नोव्हेंबर रोजी हे दोनदिवसीय संमेलन पार पडणार आहे. महाराष्ट्र साहित्य व सांस्कृतिक मंडळ आणि कवी कुसुमाग्रज सार्वजनिक वाचनालय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या संमेलनाच्या अध्यक्षपदी नाटककार आणि कलाकार योगेश सोमण यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या साहित्य संमेलनामुळे नवी मुंबईतील साहित्यप्रेमींना साहित्यविश्वातील मान्यवरांशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. मराठी साहित्याच्या विविध प्रवाहांची ओळख करून देण्याबरोबरच भाषा, संस्कृती आणि साहित्य क्षेत्रातील घडामोडींना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हा या संमेलनामागील प्रमुख उद्देश आहे. सध्या मराठी साहित्य आणि वाचनसंस्कृतीला प्रोत्साहन देण्याची गरज व्यक्त होताना अशा साहित्य संमेलनांचे महत्त्व अधिक वाढले आहे. नवी मुंबईत प्रथमच जिल्हास्तरीय संमेलन होत असल्याने स्थानिक साहित्यिक, कवी, लेखक, विद्यार्थी आणि साहित्य रसिकांसाठी ही महत्त्वाची संधी ठरणार आहे. या संमेलनाच्या निमित्ताने मराठी भाषेच्या समृद्ध साहित्य परंपरेचा जागर होण्यासही मदत होणार आहे, अशी भावना साहित्य प्रेमी ललित पाठक यांनी व्यक्त केली आहे. नवी मुंबईकरांनी या संमेलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. साहित्यिक उपक्रमांना प्रोत्साहन देत हे संमेलन यशस्वी करावे, असे आवाहन कवी कुसुमाग्रज सार्वजनिक वाचनालय संस्थेचे कार्यवाह भूषण मालवणकर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.