रब्बीपाठोपाठ भाजीपाल्याची चिंता

रब्बीपाठोपाठ भाजीपाल्याची चिंता
Published on: 

रब्बीपाठोपाठ भाजीपाल्याची चिंता

पावसाची लवकर माघार, थंडीही गायब

विक्रमगड (बातमीदार) : विक्रमगड तालुक्यात यंदा पावसाने लवकर परतीचा मार्ग धरल्याने रब्बी हंगामातील पिकांवर परिणाम झाला आहे. जमिनीतील ओलावा कमी झाल्याने अनेक शेतकऱ्यांना पाण्याअभावी अपेक्षित पिकांची लागवड करता आलेली नाही. त्यामुळे विहीर, बोअरवेल आदी सिंचन सुविधा असलेले शेतकरी आता भाजीपाला लागवडीकडे वळले आहेत. मात्र, नोव्हेंबर महिना सुरू होऊनही अपेक्षित थंडी पडत नसल्याने उत्पादनाबाबत शेतकऱ्यांमध्ये चिंता आहे.
या काळात वांगी, टोमॅटो, मिरची, कोबी, फ्लॉवर, भेंडी, वाल आणि विविध पालेभाज्यांची लागवड केली जाते. पहाटेचा गारवा, धुके आणि पोषक तापमान भाजीपाला पिकांच्या वाढीसाठी अनुकूल ठरते. मात्र, यंदा थंडीचा अभाव आणि दिवसा पडणारे कडक ऊन यामुळे पिकांच्या वाढीवर परिणाम होण्याची भीती आहे. त्यामुळे लागवड करावी की पोषक हवामानाची प्रतीक्षा करावी, असा संभ्रम शेतकऱ्यांमध्ये आहे.
भाजीपाला लागवडीसाठी बियाणे, रोपे, खते, औषधे आणि मजुरीवर मोठा खर्च करावा लागतो. हवामानाची साथ न मिळाल्यास उत्पादन घटून आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. आधीच पावसाच्या लवकर परतीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना आता थंडीच्या अभावाचाही सामना करावा लागत आहे. त्यामुळे यंदाचा भाजीपाला हंगाम तरी समाधानकारक व्हावा, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.