

लग्नाच्या भूलथापा देऊन
सहा वर्षे शारीरिक शोषण
दुसरे लग्न केल्यानंतरही छळ, जीवे मारण्याची धमकी
कल्याण, ता. १३ (वार्ताहर) : लग्नाच्या भूलथापा देऊन सहा ते सात वर्षे शारीरिक शोषण केल्याचा आणि त्यानंतर दुसरे लग्न करूनही छळ सुरू ठेवल्याचा धक्कादायक प्रकार कल्याणमध्ये उघडकीस आला आहे. तसेच जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरुणीला आरोपीच्या नातेवाइकांनी तीन तास डांबून ठेवल्याचा आणि कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा दावाही तक्रारीत करण्यात आला आहे. याप्रकरणी महात्मा फुले पोलिसांनी सुजल गायकवाड याला अटक केली असून, न्यायालयीन कोठडीनंतर त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
पीडितेच्या तक्रारीनुसार, आरोपीसोबत गेल्या सहा ते सात वर्षांपासून तरुणीचे प्रेमसंबंध होते. ६ एप्रिल रोजी विवाह केल्यानंतरही आरोपीने दुसरे लग्न करण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप तरुणीने केला आहे. या प्रकारामुळे मानसिक तणावातून तरुणीने विषाच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. सुजलने १३ मे रोजी दुसरे लग्न केल्यानंतरही तिचा छळ सुरू ठेवल्याचा आरोप आहे.
याप्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक बळीराम सिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पुढील तपास महात्मा फुले पोलिस करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.