

अंबरनाथ, ता. १३ (वार्ताहर) : दिवाळीत फटाके फोडण्यावरून झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाल्याची घटना अंबरनाथ पूर्वेतील कानसई सेक्शन परिसरात घडली. या प्रकरणात दाम्पत्यावर टोळक्याने हल्ला केल्याचा आरोप झाल्यानंतर आता दुसरी बाजूही समोर आली आहे. वादात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या तरुणाला लोखंडी चावीने मारहाण केल्याची तक्रार पोलिसांत दाखल झाली आहे. प्रितिश इंगळे याने श्रेयस पाटील आणि त्यांची पत्नी शर्मिष्ठा दत्ता यांच्याविरोधात तक्रार दिली आहे.
प्रितिशच्या तक्रारीनुसार, ९ नोव्हेंबरला रात्री साडेअकराच्या सुमारास तो मित्र जय खैरनार याच्यासोबत सोसायटीजवळील दवाखान्यासमोरील बाकावर बसला होता. त्यावेळी परिसरात फटाके फोडले जात होते. जवळच फटाका फुटल्याने ईश्वर ब्लिस सोसायटीतील श्रेयस पाटील यांनी शिवीगाळ सुरू केली. यावर प्रितिशने त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावरून वाद वाढला. जाब विचारण्यासाठी गेलेल्या प्रितिशला श्रेयस यांनी हातातील लोखंडी चावीने कानाखाली व हनुवटीवर मारहाण केली. तसेच छातीवर लाथ मारून बरगड्यांवर ठोसे मारल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
दरम्यान, उपस्थितांनी दोघांमधील भांडण सोडवल्यानंतर काही वेळातच चार ते पाच अनोळखी व्यक्ती घटनास्थळी आल्या. त्यांनी श्रेयस पाटील आणि त्यांच्या पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी आपण मध्यस्थी करण्यासाठी गेलो असता, त्या व्यक्तींना आपणच बोलावल्याचा गैरसमज दाम्पत्याचा झाल्याचे प्रितिशने तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संबंधितांना पोलिस ठाण्यात नेले. या प्रकरणाचा पुढील तपास शिवाजीनगर पोलिस करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.