

शिवशाहीचे ११६ कोटी भाडे थकीत
पाच विकसकांना चार महिन्यांचा अल्टिमेटम
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : शिवशाही पुनर्वसन प्रकल्प लिमिटेडचे मुंबईत झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबवणाऱ्या पाच विकसकांकडे सुमारे ११६ कोटी रुपयांचे भाडे थकीत आहे. गेल्या १० ते १५ वर्षांपासून ही थकबाकी मागील पानावरून पुढे जात आहे. त्याची उपमुख्यमंत्री व गृहनिर्माण मंत्री तथा शिवशाहीच्या बोर्डाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली असून, नुकत्याच झालेल्या बोर्ड मीटिंगमध्ये ही थकबाकी चार महिन्यांत वसूल करण्याचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. त्यामुळे शिवशाहीच्या अधिकाऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे.
शिवशाहीने एसआरए योजना राबवणाऱ्या विकसकांना झोपडपट्टीधारकांची तात्पुरती सोय करण्यासाठी सदनिका भाडेतत्त्वावर दिल्या आहेत. त्यापैकी पाच विकसकांनी गेल्या १०-१५ वर्षांपासून शिवशाहीला भाडेच भरलेले नाही. त्यामुळे मूळ भाडे, व्याज आणि वार्षिक वाढ अशी थकबाकीची एकूण रक्कम ११६ कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे. ही रक्कम भरण्यासाठी सवलत द्यावी, अशी विकसकांनी मागणी केली होती. त्यानुसार व्याज आणि भाडेवाढीत कपात करून भाडे भरण्यासाठी सवलत योजना जाहीर केली होती. त्यानुसार केवळ एकाच विकसकाने थकीत रक्कम भरली असून, उर्वरित पाच विकसकांकडे थकबाकी कायम आहे. त्याबाबत शिवशाहीच्या बोर्ड मीटिंगमध्ये चर्चा झाली असून, गृहनिर्माणमंत्र्यांनी ही वसुली का होत नाही, अशी विचारणा करीत अधिकाऱ्यांना फौलावर घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, विकसक थकबाकी वसुलीच्या पत्रव्यवहाराला प्रतिसादच देत नसल्याने कायदेशीर कारवाई करण्याच्या हालचाली प्रशासनाने सुरू केल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.