‘जलसा’चा वाद नव्या वळणावर

‘जलसा’चा वाद नव्या वळणावर
Published on: 

‘जलसा’चा वाद नव्या वळणावर
प्रॉपर्टी कार्डवर रमोला बच्चन यांचे नाव
मुंबई, ता. १४ : ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या जुहू येथील जलसा बंगल्याच्या मालकीवरून सुरू असलेला कौटुंबिक वाद पुन्हा चर्चेत आला आहे. महाराष्ट्र सरकारच्या प्रॉपर्टी कार्डवर अमिताभ यांचे धाकटे बंधू अजिताभ बच्चन यांच्या पत्नी रमोला बच्चन यांचे नाव अजूनही नोंदवलेले आहे. तर कपोल हाउसिंग सोसायटीच्या नोंदींमध्ये जया बच्चन यांचे नाव मालक म्हणून आहे. त्यामुळे बंगल्याच्या मालकीबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत.

रमोला यांनी १९९३मध्ये तयार करण्यात आलेल्या बक्षीसपत्राला आव्हान दिले आहे. या बक्षीसपत्राद्वारे ‘जलसा’ बंगल्याची मालकी जया बच्चन यांच्या नावावर करण्यात आली होती; मात्र ही प्रक्रिया आपली माहिती किंवा संमती न घेता करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. गेल्या सात महिन्यांत त्यांनी यासंदर्भात नोंदणी अधिकाऱ्यांकडे अनेक तक्रारी दाखल केल्या आहेत.
अंधेरी येथील सहकारी संस्था उपनिबंधक कार्यालयाचे अधिकारी फैयाज मुलानी यांनी तक्रार मिळाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या प्रकरणाची सुनावणी सुरू असून, संबंधित पक्षांना आपली बाजू मांडण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान, अमिताभ बच्चन यांनी यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. बक्षीसपत्राची वैधता आणि बंगल्याच्या मालकीबाबत अधिकाऱ्यांचा निर्णय अद्याप झालेला नाही.
....
प्रक्रियेवर आक्षेप
जलसा बंगल्याचे १९९३ मधील बक्षीसपत्र मुद्रांक शुल्क न भरता साध्या कागदावर तयार करण्यात आले होते. त्यावर साक्षीदारांच्या स्वाक्षऱ्याही नव्हत्या, असा आरोप रमोला यांनी केला आहे. महाराष्ट्र सरकारच्या अभय योजनेअंतर्गत या दस्तऐवजाची नंतर नोंदणी करून तो नियमित करण्यात आल्याच्या प्रक्रियेवरही त्यांनी आक्षेप घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.