

तुर्भे, ता. १५ (बातमीदार) : समान नागरी कायद्याबाबत (यूसीसी) नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी कोकण विभागात २१ व २२ नोव्हेंबरला कोकण भवन, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई येथील आयुक्त कार्यालयात विभागीय स्तरावर जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे. जनसुनावणीत संबंधित गट, संस्था यांचे प्रतिनिधी तसेच नागरिकांनी निर्धारित दिवशी व वेळेत उपस्थित राहून आपली मते मांडावीत, असे आवाहन विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी केले आहे.
समान नागरी कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखालील समिती महाराष्ट्रात महसूल विभागनिहाय जनसुनावणीसाठी भेट देणार आहे. या जनसुनावणीच्या माध्यमातून विवाह, घटस्फोट, सहजीवन (लिव्ह-इन) नातेसंबंध, भरण-पोषण, पालकत्व, वारसाहक्क व उत्तराधिकारी हक्क या विषयांबाबत नागरिकांची मते जाणून घेण्यात येणार आहेत.
सुनावणीचे नियोजन जिल्हानिहाय करण्यात आले असून, यात २१ नोव्हेंबरला मुंबई शहर सकाळी ११ ते दुपारी १२, मुंबई उपनगर दुपारी १२.३० ते १.३०, पालघर दुपारी ३ ते ४ आणि सिंधुदुर्ग दुपारी ४.३० ते ५.३० या वेळेत जनसुनावणी होईल. तसेच २२ नोव्हेंबरला ठाणे सकाळी ११ ते दुपारी १२, रायगड दुपारी १२.३० ते १.३० आणि रत्नागिरी दुपारी ३ ते ४ या वेळेत होईल. जनसुनावणीसाठी नागरिकांनी कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात किंवा संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील निर्धारित वेळेच्या एक तास आधी समक्ष उपस्थित राहावे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.