

कल्याण, ता. १५ (वार्ताहर) : पश्चिमेतील साईचौक परिसरात असलेल्या ऑर्बिट कमर्शियल कॉम्प्लेक्समधील चौथ्या मजल्यावर सुरू असलेल्या बेकायदा हुक्का पार्लरवर खडकपाडा पोलिसांनी कारवाई केली आहे. ‘द व्हिंटेज स्काय लाँज’ या नावाने चालवल्या जाणाऱ्या या आस्थापनेवर शुक्रवारी (ता. १३) रात्री सव्वाअकराच्या सुमारास हा छापा टाकण्यात आला. या प्रकरणी पार्लरच्या मालकासह व्यवस्थापक, कर्मचारी आणि ग्राहकांसह एकूण २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी ३६ हजारांचे साहित्य जप्त केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आस्थापनेचा मालक अजीम तारीख कांबळे (वय २९), व्यवस्थापक हुसेन हेमंत कल्याणवाला (३०), कॅशियर साहिल आसरानी (२८), हुक्का मेकर रवी मनोज दास (२४) आणि चार वेटर यांनी हा प्रकार चालवला होता. सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यास बंदी असतानाही या ठिकाणी तंबाखूजन्य आणि ज्वालाग्राही हुक्का ग्राहकांच्या टेबलावर पुरवून मानवी जीवितास धोका निर्माण करण्यात आला होता. या कारवाईदरम्यान १२ ग्राहक सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करताना आढळून आले. याप्रकरणी मालक कांबळे, हेमंत, साहिल, रवी यांच्यासह हंजला शहा, अकबाल अली, अफ्तार अली, इरफान शेख, हितेश मंगलानी, आसीर काझी, अजलाम शेख, उमर मोहम्मद, नबील खान, सूरज सिंग, अक्षय पाटील आणि अल्पेश म्हात्रे आदींसह २० जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.