ठाण्यात वीजचोरांविरोधात महावितरणची कारवाई

ठाण्यात वीजचोरांविरोधात महावितरणची कारवाई
Published on: 

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १५ : वीजदेयक थकबाकी आणि अनधिकृत वीजवापर रोखण्यासाठी महावितरणकडून सुरू असलेल्या तपासणी मोहिमेत ठाण्यात वीजचोरीची प्रकरणे समोर आली आहेत. नितीन कंपनी, उन्नती इस्टेट, इंदिरानगर आणि वागळे इस्टेट या परिसरात केलेल्या तपासणीत मीटरमध्ये फेरफार, थेट वीजजोडणी तसेच मीटरच्या वायरमध्ये बदल करून वीज वापरल्याचे आढळले. या प्रकरणांमध्ये संबंधित ग्राहकांविरोधात पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

नितीन कंपनी परिसरातील मीना अपार्टमेंटजवळ निवास आयर्न स्टील या व्यावसायिक ग्राहकाच्या मीटरची तपासणी केली असता दोन फेजच्या वायरमध्ये बदल करून अनधिकृत वीजवापर सुरू असल्याचे आढळले. आसिफ अली चौधरी याने चार महिन्यांत १,३६३ युनिट वीजचोरी करून महावितरणचे ३२ हजार ४५० रुपयांचे नुकसान केल्याचे तपासणीत स्पष्ट झाले. उन्नती इस्टेट येथील महेश सरपटे यांच्या स्मार्ट मीटरमध्ये इलेक्ट्रॉनिक सर्किट बसवून रीडिंग कमी येण्याची व्यवस्था केल्याचे उघड झाले. या प्रकारातून सुमारे सहा हजार ८९० रुपयांची वीजचोरी झाल्याचे महावितरणच्या तपासणीत समोर आले. इंदिरानगर येथील धर्मेंद्र गुप्ता यांच्या घरात वीजमीटर नसताना थेट खांबावरून वायर जोडून वीज वापरली जात असल्याचे आढळले. वर्षभरात १,७५२ युनिट वीजचोरी करून ५६ हजार ४८० रुपयांचे नुकसान केल्याचा दावा आहे. याशिवाय वागळे इस्टेट परिसरातील आणखी एका वीजजोडणीच्या तपासणीत अनधिकृत वापराची बाब समोर आली. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी पंचनामे करून अनधिकृत जोडण्या खंडित केल्या असून, काही ठिकाणी वीजचोरीसाठी वापरलेले साहित्यही जप्त केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.