

पर्यटकांमुळे बाजारपेठेला उभारी
अलिबाग-मुरूडकडे जाणाऱ्या पर्यटकांची वाढती संख्या; स्थानिक विक्रेत्यांच्या उत्पन्नात भर
पोयनाड, ता. १५ (बातमीदार) : थंडीचा हंगाम सुरू होताच पर्यटनासाठी बाहेर पडणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे. डिसेंबर महिन्यात अलिबाग आणि मुरूड येथे येणाऱ्या पर्यटकांच्या वर्दळीचा फायदा पोयनाड आणि पेझारी नाका येथील स्थानिक बाजारपेठेला होत आहे. या पर्यटकांमुळे वडापावविक्रेते, भाजीविक्रेत्या महिला तसेच अन्य छोट्या व्यावसायिकांच्या व्यवसायाला चालना मिळाली आहे.
गेल्या काही वर्षांत गोव्याऐवजी अलिबाग आणि मुरूड येथे सुट्ट्या घालवण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. या मार्गावर असलेल्या पोयनाड आणि पेझारी नाका येथे पर्यटक थांबून खाद्यपदार्थ आणि स्थानिक वस्तूंची खरेदी करतात. त्यामुळे येथील विक्रेत्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळत आहे.
पूर्वी पेझारी नाक्यावरील वडापावविक्रेत्यांकडे प्रामुख्याने शनिवार-रविवारी गर्दी होत असे, मात्र पर्यटन हंगामात आता आठवडाभर ग्राहकांची वर्दळ वाढली आहे. स्थानिक शेतकरी आणि आदिवासी महिलांनी पिकवलेल्या भाज्यांनाही पर्यटकांकडून मागणी मिळत आहे. याशिवाय परिसरातील अन्य वस्तूंची विक्रीही वाढली आहे. पोयनाड नाक्यावरील अरुंद रस्त्यामुळे विक्रेत्यांना व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून घेण्यात अडचणी येतात. तुलनेने पेझारी नाक्यावर विक्रेत्यांची संख्या अधिक असून तेथे विविध वस्तूंची विक्री केली जाते.
वाहतुकीचा प्रश्न कायम
पेण-अलिबाग राज्य मार्गावरील पोयनाड ते पेझारीदरम्यान आठवड्याचे सातही दिवस वाहतूक कोंडी होते. पर्यटनामुळे स्थानिक व्यवसायांना फायदा होत असला, तरी वाढत्या वाहनसंख्येमुळे वाहतूक व्यवस्थेवरील ताण कायम आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.