

रस्ते रुंदीकरणाला वेग
पर्यटन हंगामातील वाहतूक कोंडीवर उपाययोजना; आंबेडकर चौकासह महत्त्वाच्या मार्गांवर सुधारणा
अलिबाग, ता. १५ (वार्ताहर) : वाढती पर्यटकसंख्या आणि झपाट्याने होत असलेल्या शहरीकरणामुळे अलिबाग शहरातील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. विशेषतः पर्यटन हंगामात शहरात प्रवेश करतानाच नागरिक आणि पर्यटकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. या समस्येवर उपाय म्हणून अलिबाग नगरपरिषदेने शहरातील प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण आणि डांबरीकरण हाती घेतले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील वाहतूक सर्कल परिसरासह आर्यन डेव्हलपर्स परिसरातील रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येत असून, आंबेडकर चौक ते महावीर चौक या मार्गाच्या डांबरीकरणाचे कामही सुरू करण्यात येत आहे.
माजी नगराध्यक्ष तथा वीज व बांधकाम समिती सभापती प्रशांत नाईक यांच्या पुढाकारातून ही कामे करण्यात येत आहेत. शहराचे मुख्य केंद्र असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात वाहनांची मोठी वर्दळ असते. या परिसरातील रस्त्याची उपलब्ध जागा वाढविण्यात येत असल्याने वाहनांच्या वाहतुकीला अधिक मोकळीक मिळणार आहे. आर्यन डेव्हलपर्स परिसरातील रस्त्याचेही रुंदीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे या भागातील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.
दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते महावीर चौक या महत्त्वाच्या मार्गाच्या डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामामुळे रस्त्यावरील खड्ड्यांची समस्या दूर होण्यास मदत होईल. तसेच डांबरीकरणामुळे रस्त्याची उंची काही प्रमाणात वाढणार असल्याने पावसाळ्यात पाणी साचण्याच्या समस्येतही घट होण्याची अपेक्षा आहे.
अलिबाग हे रायगड जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळ असल्याने वर्षभर पर्यटकांची ये-जा सुरू असते. सुट्ट्या आणि पर्यटन हंगामात वाहनांची संख्या वाढल्याने शहरातील प्रमुख चौक आणि रस्त्यांवर वाहतुकीचा ताण निर्माण होतो. त्यामुळे केवळ रस्त्यांची डागडुजी न करता वाहतुकीच्या दृष्टीने आवश्यक पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यावर नगरपरिषदेने भर दिला आहे.
प्रतिक्रिया :
अलिबागचा विकास हा केवळ रस्ते रुंदावण्यापुरता मर्यादित नाही. प्रत्येक अलिबागकराचा प्रवास सुकर करणे आणि पर्यटकांसाठी शहराचा अनुभव अधिक सुखद बनविणे हा त्यामागील उद्देश आहे. अलिबागची पर्यटननगरी म्हणून ओळख अधिक समृद्ध करताना नागरिकांच्या सुविधांना नेहमीच प्राधान्य देऊ.
— प्रशांत नाईक, वीज व बांधकाम सभापती, अलिबाग नगर परिषद
शहराच्या विकासाला नवी दिशा
रस्त्यांचे रुंदीकरण, दर्जेदार डांबरीकरण आणि वाहतुकीतील अडथळे दूर करण्याच्या माध्यमातून शहरातील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न होत आहे, मात्र वाढत्या वाहनसंख्येच्या तुलनेत भविष्यातील वाहतूक नियोजन, पार्किंग व्यवस्था आणि चौकांमधील वाहतूक नियंत्रण याकडेही लक्ष देणे आवश्यक ठरणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.